आयपीएल २०२१ चा सामना ३७ वा सामना शनिवारी (२५ सप्टेंबर) पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात स्टार फलंदाज ख्रिस गेलने हैदराबादविरुद्ध १७ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने १४ धावांची संथ खेळी खेळली. रशीद खानने त्याला पायचीत बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र वेस्ट इंडिजच्या ४२ वर्षीय गेलने या खेळीदरम्यान एक अनोखा विक्रम केला.
ख्रिस गेल आयपीएलमध्ये वयाच्या ४० किंवा त्याहून अधिक वयाच्या गटामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. या खेळीसह, त्याने ४८० धावांचा टप्पा गाठला आहे. यासह त्याने महान फलंदाज राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे. राहुलने आयपीएलमध्ये वयाची ४० वर्षे ओलांडल्यानंतर ४७१ धावा केल्या होत्या. तर ऍडम गिलख्रिस्ट ४६६ धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धात गेलचा हा पहिलाच सामना होता.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करतांना पंजाबचा संघ २० षटकात केवळ १२५ धावा करू शकला. सलामीवीर मयांक अग्रवाल फक्त ५ धावा करून बाद झाला. तर लोकेश राहुल २१ धावा करून बाद झाला. दोन्ही सलामीवीरांना जेसन होल्डरने बाद केले. त्यांनंतर वेगवान खेळीसाठी ओळखला जाणाऱ्या ख्रिस गेलने १७ चेंडूत फक्त १४ धावा केल्या. त्याला राशीद खानने चालते केले.
एडन मार्करम ३२ चेंडूत २७ धावा केल्या. निकोलस पुरणने ८ धावा केल्या. त्याच्या खेळीत त्याने एक षटकार लगावला. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी काही आक्रमक फटके मारण्याचा प्रयत्न केले. दीपक हुडाने १३ धावा केल्या तर नॅथन ऍलिस १२ चेंडूत १२ धावा केल्या. हरप्रीत ब्रारने १८ धावा आणि शमी शून्य धावावर नाबाद राहिले.
याच्या उत्तरादाखल, मैदानात १२६ धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेल्या हैदराबादची सुरुवात अत्यंत वाईट झाली. पहिल्याच षटकात अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर २ धावांवर बाद झाल्या त्यापाठोपाठ कर्णधार केन विलियमसनदेखील एक धाव करुन बाद झाला. या सामन्यात हैदराबादकडून जेसन होल्डर (४७) आणि सलामीवीर रिद्धीमान साहा (३१) व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. परिणामी हैदराबादला निर्धारित २० षटकात ७ गड्यांच्या बदल्यात १२० धावांपर्यंतच मजल मारता आली आणि पंजाबने ५ धावांनी सामना सहज खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
SRHvPBKS: शेवटच्या क्षणी पंजाबची बाजी, ५ धावांनी हैदराबादला दिला धोबीपछाड
नादच नाय! हुड्डाचा पूर्ण ताकदनिशी फटका अन् हैदराबादच्या पठ्ठ्याचा हवेत उडत एकहाती ‘ब्लाइंडर कॅच’
सीएसकेचा हुकुमी एक्का असूनही ब्रावो अन् धोनीमध्ये सतत बिनसतं, स्वत: थालाने सांगितले यामागचे कारण