वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू ख्रिस गेल नेहमीच तोडफोट फलंदाजीसाठी ओळखला गेला. आयपीएलमध्येही त्याने अनेक वर्ष सक्रिय सहभाग घेतला. विराट कोहली याच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा गेल महत्वाचा भाग होता. विराटच्या नेतृत्वातील या संघात गेलसह एबी डिविलियर्स आणि इतर अनेक स्टार खेळाडू खेळले. पण एकदाही त्यांना विजेतेपद पटकावता आले नाही. याच पार्श्वभूमीवर गेलने एका मुलाखतीत आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकता न आल्याचे कारण स्पष्ट खेले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाचा चाहतावर्ग मोठा आहे. संघात विराट कोहली (Virat Kohli), एबी डिविलियर्स (AB de Villiers) आणि ख्रिस गेल यांच्यासह एकापेक्षा एक खेळाडू खेलत असले, तरी आरसीबीला एकही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाहीये. याच कारणास्तव आरसीबी फ्रँचायझी नेहमीच ट्रोल होत आली. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) सध्या डब्ल्यूपीएलमध्ये आरसीबीचे नेतृत्व करत आहे. मंधानाच्या नेतृत्वातील महिला आरसीबी संघ मालिकेतील पहिल्या पाच सामन्यांमध्ये पराभूत झाला आणि त्यांना देखील ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. अशातच एका मुलाखतीत ख्रिस गेल (Chris Gayle) याने आरसीबीला ट्रॉफी विजायात येणाऱ्या अपयशामागेच कारण स्पष्ट केले.
विराट, डिविलियर्स आणि गेल आरसीबीसाठी एकत्र खेळत असताना विरोधकांसाठी सर्वात मोठे आव्हान या तिघांचे असायचे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांमध्येही या तिघांना नेहमीच अधिक स्थान मिळत असे आणि संघातील इतर खेळाडू प्रकाशझोतात कधीच येत नव्हते. गेलच्या मते संघातील तिघांनाच अधिक महत्व मिळत असल्याने आणि इतरांना कमी महत्व मिळत असल्यामुळे आरसीबीला कधीच ट्रॉफी जिंकता आली नाही.
गेल जिओ सिनेमावर बोलत होता. यावेळी तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही संघाचे मुख्य खेळाडू असता, तेव्हा नेहमीच एका झोनमध्ये असता. आरसीबीच्या दृष्टीने पाहिले, तर अनेक खेळाडू स्वतःला संघाचा भाग मानत नव्हते, असे मला वाटते. अनेकांना असे वाटत होते की, ते या फ्रँचायझीचा भाग नाहीत. मला, विराटला आणि एबि डिविलियर्सलाच सर्व महत्व मिळत आहे, असेही मला वाटत होते. त्यामुळ इतर खेळाडूंना ते संघाचा भाग असल्यासारखे वाटतच नव्हते. संघात अशा गोष्ट झाल्यानंतर विजेतेपद मिळवणे कठीण होऊन बसते.”
(Chris Gayle has revealed the reason why RCB have not won a single trophy of IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेट लीने सांगितले टीम इंडियाचे भविष्य, डब्ल्यूटीसी फायनल आणि वनडे विश्वचषक कोण जिंकणारा वाचाच
कॅलिस-टेलवर भारी पडली दिलशान-थरंगाची जोडी! आफ्रिदीच्या आशिया लायन्सने जिंकली लिजेंड्स लीगची ट्रॉफी