भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटू सध्या अनेक धार्मिक ठिकाणी दिसून येतात. वरिष्ठ फलंदाज विराट कोहली हा थोड्या विश्रांतीच्या काळात अनेक देवस्थानांना आपल्या कुटुंबासह भेट देताना दिसतो. त्याचवेळी आता कसोटी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज उमेश यादव याने देखील नुकतीच उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. त्याच्या या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानची कसोटी मालिका नुकतीच समाप्त झाली. या मालिकेत उमेश यादव याने चांगली कामगिरी करून दाखवली होती. मात्र, या दरम्यानच त्याच्या वडिलांचे निधन देखील झालेले. तर, काही काळानंतर त्याच्या पत्नीने दुसऱ्या मुलीला देखील जन्म दिलेला. या सर्व पार्श्वभूमीवरच उमेश आपल्या कुटुंबासह उज्जैन येथे पोहोचला.
Umesh Yadav visited the Mahakaleshwar Jyotirlinga Temple in Ujjain. pic.twitter.com/Cl6vyBDU9H
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 20, 2023
सोमवारी (20 मार्च) उमेश आपल्या पत्नीसह उज्जैन येथे पोहोचला. सकाळी पहाटे चार वाजता त्याने मंदिरात प्रवेश केला. या ठिकाणी उमेशने आपल्या पत्नीसह अभिषेक व पूजा केली. यानंतर बोलताना तो म्हणाला, “मी देवाकडे जगामध्ये सर्वांना सुखी समाधानी ठेव अशी प्रार्थना केली आहे.”
उमेश यादव आगामी काळात इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसेल. आयपीएल 2023 मध्ये तो आता कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
यापूर्वी उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराला भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने आपल्या पत्नीसह भेट दिली होती. तसेच भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज केएल राहुल व त्याची पत्नी आथिया शेट्टी यांनी देखील या ठिकाणी पूजा केलेली. भारत आणि श्रीलंका वनडे सामन्यावेळी भारतीय संघातील सदस्य असलेल्या सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर व युजवेंद्र चहल यांनी देखील महाकालेश्वरचे दर्शन घेतलेले.
(After Virat Kohli And KL Rahul Umesh Yadav Visit Ujjains Mahakaleshwar Temple With Wife)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सॅमसनवर अन्याय होतोय का? वनडेत दर्जा कामगिरी करूनही संघ व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष
अखेर पेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती! कठीण काळात सांभाळलेले ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद