आयपीएलच्या 17 व्या हंगामाला आता फक्त मोजून पाच दिवस शिल्लक आहेत. तसेच आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. याआधी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात येणार आहे. अशा चर्चा सगळीकडे सुरू आहेत. तसे असताना जोफ्रा आर्चरच्या इन्स्टाग्राम स्टोरीने या सगळ्या चर्चेनां अजुन जास्त जोर दिला आहे.
याबरोबरच जोफ्रा आर्चर आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग होता. मात्र त्या हंगामात जोफ्रा आर्चर फक्त मोजकेच सामने खेळू शकला होता. त्यानंतर जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सने IPL 2024 च्या लिलावापूर्वी जोफ्रा आर्चरला संघातून मुक्त केले होते. तसेच सांगायला गेलं तर जोफ्रा आर्चर दुखापतीनंतर बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यानंतर आर्चर क्रिकेटच्या मैदानात परतला असून त्याने कौंटी चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वी बेंगळुरूला पोहोचला असून तेथे सर्व तयारी करत आहे.
अशातच जोफ्रा आर्चरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या ड्रेसिंग रूमचा एक फोटो शेअर केला आहे. यामुळे आरसीबीचे चाहते जास्तच खुश झाले आहेत. त्यामुळे आता सगळीकडे एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे की आर्चर 2024 च्या हंगामासाठी आयपीएल करार मिळविण्यासाठी उशिरा प्रयत्न करत आहे का? तसेच याबाबात अजुनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही की आर्चर खरोखरच आरसीबीमध्ये जाणार आहे का?
Jofra Archer's latest Instagram story.📱
– He is currently at RCB's Bar & Cafe at Bengaluru. ❤️#JofraArcher #RCB #CSKvRCB #CSKvsRCB #IPL #IPL2024 pic.twitter.com/shgV4lT5yo
— The Cricket TV (@thecrickettvX) March 17, 2024
दरम्यान, आर्चर सध्या भारतात असून बंगलोरमध्येच आहे. तसेच आर्चर सध्या त्याच्या काउंटी क्लब ससेक्ससोबत भारत दौऱ्यावर असून तो सध्या बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. तसेच जोफ्रा आर्चरने मुंबईसोबत खेळण्याबाबत दुखापतीचे कारण दिले होते. त्यामुळे त्याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तो आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामील होऊ शकतो.
तसेच टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी आर्चर ससेक्स संघासोबत भारतात आला होता. तसेच टी20 विश्वचषक जूनमध्ये होणार आहे. त्याआधी आर्चर पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी इंग्लंडची अपेक्षा आहे. तत्पूर्वी तो आयपीएल स्पर्धेत नशिब आजमावू शकतो. मात्र तो खेळणार की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.
"Exciting to see Jofra Archer in action for Karnataka vs Sussex in a 2-day test match! 🏏 He's off to a flying start, taking a wicket in his very first over! 🔥 #Cricket #JofraArcher" pic.twitter.com/66avUZBSVi
— Hemant ( Sports Active ) (@hemantbhavsar86) March 15, 2024
आयपीएल 2024 साठी RCB संघ: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाक, मनोज भंडागे, मयंक डागर, विल जॅक्स, महिपाल शर्मा, लोन कर्णधार. जोसेफ, आकाश दीप, मोहम्मद सिराज, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, रीस टोपले, हिमांशू शर्मा, स्वप्नील सिंग, टॉम करन, सौरव चौहान, यश दयाल, लकी फर्ग्युसन.
महत्वाच्या बातम्या –