आयपीएल 2024 पूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क भारतात पोहोचला. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला कोलकाता नाइट रायडर्सनं लिलावात तब्बल 24.75 रुपयांना विकत घेतलं होतं.
केकेआरनं मिचेल स्टार्कच्या भारतातील आगमनाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये स्टार्कच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं. यावरून तो स्पर्धेसाठी किती उत्साही आहे हे दिसून येतं. यावेळी स्टार्कनं हाफ ब्लॅक टी-शर्ट घातला होता.
मिचेल स्टार्क यापूर्वीही इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळला आहे. त्यावेळी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. आता तो 9 वर्षांनंतर स्पर्धेत पुनरागमन करतोय. मिचेल स्टार्कनं शेवटचा आयपीएल सामना 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळला होता, जो त्या हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना होता. त्या सामन्यात स्टार्कनं 4 षटकात 27 धावा देऊन 1 बळी घेतला होता.
आता आयपीएलच्या या हंगामात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजावर असतील, कारण तो लीगमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल 2024 मध्ये केकेआरकडून खेळताना स्टार्क आपल्या किमतीला न्याय देतो की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 17, 2024
मिचेल स्टार्कनं 2014 च्या हांगामात आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 2014 आणि 2015 मध्ये दोन वर्ष खेळला. या काळात त्यानं 27 सामने खेळले आणि 26 डावात गोलंदाजी करताना 20.38 च्या सरासरीनं 34 बळी घेतले. या कालावधीत स्टार्कची इकॉनॉमी 7.17 एवढी राहिली. स्पर्धेतील स्टार्कची सर्वोत्तम कामगिरी 4/15 अशी आहे.
याशिवाय या ऑस्ट्रेलियन खेळाडूनं आयपीएलच्या 12 डावात फलंदाजी करताना 96 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 29 होती. आयपीएलनंतर लगेच टी20 विश्वचषकाचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे आता तो या हंगामात कशी कामगिरी करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या हंगामात सर्वांच्या नजरा स्टार्कवर असतील यात काही शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
भावा! सोशल मीडियावर सगळीकडे आरसीबीचीच हवा! ट्रॉफी उचलतानाच्या फोटोनं रचला नवा इतिहास
WPL 2024 : आरसीबीच्या विजयावर राजस्थान रॉयल्सची चुटकी, शेअर केलं भन्नाट मिम
कप आला रे! RCB च्या पोरींनी करून दाखवलं, उचलली WPLची ट्रॉफी