आगामी आयपीएलच्या हंगामासाठी 10 संघानी तयारी सुरु केली आहे. यावेळी आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्व असून विजेतेपदासाठी 10 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. याआधी पंजाब किंग्सने आपल्या चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे. पंजाबने आयपीएल 2024 साठी आपली नवीन जर्सी जाहीर केली आहे. याबरोबरच या हंगामात शिखर धवन पंजाब किंग्जचे नेतृत्व करणार आहे. तसेच यावेळी लिलावात पंजाब किंग्जने आपल्या कॅम्पमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश केला आहे.
यामुळे पंजाब किंग्जचे चाहते त्यांच्या आवडत्या संघाकडून विजेतेपदाची मागणी करत आहेत. तसेच कर्णधार शिखर धवन प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात परतत आहे. गेल्या मोसमात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धवन चमकदार कामगिरी करत होता. तर गेल्या हंगामात पंजाब किंग्जचा संघ आठव्या स्थानावर राहिला होता. यावेळी कर्णधार शिखर धवनसमोर सर्वात मोठी समस्या असेल की तो कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात प्रवेश करेल.
पंजाब किंग्जने आयपीएलच्या मिनी लिलावात 8 खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. यामध्ये सर्वात मोठे नाव आहे हर्षल पटेलचे होते. तर त्याला पंजाब किंग्स ने 11.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याचबरोबर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सलाही पंजाब किंग्जने 4.20 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. याशिवाय पंजाब किंग्जने दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज रिले रॉसौ यालाही 8 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
अशातच पंजाब किंग्जसाठी सर्वात मोठी समस्या त्यांच्या चार परदेशी खेळाडूंची आहे. कारण यपीएल 2023 मध्ये इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, कागिसो रबाडा यांसारखी मोठी नावे असूनही, संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. तसेच शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंना अधिक संधी दिली जाऊ शकते.
Switching the vibe for our first training session! 🏏#SaddaPunjab #PunjabKings #JazbaHaiPunjabi pic.twitter.com/yKMS8i8TEN
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 17, 2024
पंजाब किंग्जची संभाव्य प्लेइंग 11- शिखर धवन (कर्णधार) , रिले रोसो,जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे,सॅम करन, शशांक सिंग,अर्शदीप सिंग, राहुल चहर, हर्षल पटेल.
महत्वाच्या बातम्या –
- CSK vs RCB सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांची चढाओढ, बुकिंग सुरू होताच वेबसाइट क्रॅश
- अर्रर्र.. पाकिस्तान संघ आला रडकुंडी,कोणी मिळत नाही नवीन कोच, आता ‘या’ दिग्गजाने दिला नकार