महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्लीचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. तसेच पराभवानंतर देखील दिल्ली कॅपिटल्स संघाला पाकिस्तान सुपर लीगपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.
याबरोबरच, दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात बेंगळुरूने 8 विकेट्सने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले आहे. त्यामुळे दिल्लीला सलग दुसऱ्या हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. तर डब्ल्युपीएल 2024 स्पर्धा जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला 6 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तसेच उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाला 3 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
गेल्यावर्षी डब्ल्युपीएल 2023 मध्येही विजेत्या मुंबई इंडियन्सलाही 6 कोटी रुपये मिळाले होते, तर दिल्ली कॅपिटल्सलाही 3 कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र सध्या चालू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग 2024 स्पर्धेच्या विजेत्याला यंदा 120 मिलियन पाकिस्तानी रुपये म्हणजेच भारतीय चलनानुसार 3.5 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच उपविजेत्याला भारतीय चलनानुसार 1.4 कोटी रुपये मिळणार आहेत. पीएसएलचा अंतिम सामना 18 मार्चला खेळला जाणार आहे. तसेच पाकिस्तान सुपर लीगमधील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेपेक्षा बेंगळुरू आणि दिल्लीला मिळालेली बक्षीस रक्कम जवळपास दुप्पट आहे.
We’re coming home, we’re coming home, tell the world we’re coming home… 🕺💃🏻🪩🎵#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2024 pic.twitter.com/BuBNdQZPSy
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 18, 2024
दरम्यान, महिला प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ अवघ्या 113 धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग बेंगळुरूने 19.3 षटकात 2 विकेट्स गमावत 115 धावा करून सहज पूर्ण केला आहे. तर अंतिम सामन्यात बेंगळुरूकडून एलिस पेरीने सर्वाधिक नाबाद 35 धावा केल्या, तर सोफी डिवाईनने 32 आणि कर्णधार स्मृती मानधनाने 31 धावा केल्या आहेत. तसेच दिल्लीकडून शिखा पांडे आणि मन्नू मनी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –