विंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने शनिवारी बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शानदार अर्धशतक केले. त्याने या सामन्यात 66 चेंडूत 73 धावा केल्या आहेत.
या अर्धशतकी खेळीत त्याने 5 षटकार मारताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 476 षटकार पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.
हा विक्रम याआधी फक्त पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता. पण आता गेल त्याच्यासह या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. या दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 476 षटकार मारले आहेत.
गेलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत वनडेमध्ये 275 षटकार, टी20 मध्ये 103 षटकार तर कसोटीमध्ये 98 षटकार मारले आहेत. तसेच आफ्रिदीने वनडेमध्ये 351 षटकार, टी20 मध्ये 73 षटकार तर कसोटीमध्ये 52 षटकार मारले आहेत.
शनिवारी झालेल्या सामन्यात विंडिजकडून रोव्हन पॉवेल आणि शाय होपनेही अर्धशतके केली. परंतू त्यांना बांगलादेशने दिलेल्या 302 धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यात अपयश आले. विंडिजने 50 षटकात 6 बाद 283 धावा केल्या. त्यामुळे त्यांना 18 धावांनी पराभव पत्करावा लागला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:
476 षटकार – शाहिद आफ्रिदी / ख्रिस गेल
398 षटकार – ब्रेंडन मॅक्यूलम
352 षटकार – सनथ जयसुर्या
342 षटकार – एमएस धोनी
328 षटकार – एबी डेविलियर्स
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–ब्रिटिश जनतेला लवकरच कळेल, कोहली काय चीज आहे!
–काय सांगता! कपिल देव पुन्हा एकदा भारताकडून खेळण्यासाठी सज्ज
–नेहराजींनी दिले भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज इशांत शर्माला गोलंदाजीचे धडे