इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. या लिलावात सर्वच संघांनी आपल्याला गरज असलेल्या खेळाडूंवर बोली लावत त्यांना आपल्या संघात सामील करून घेतले. या लिलावावेळी प्रसारण वाहिनीसाठी काही माजी क्रिकेटपटू एक्सपर्ट म्हणून जोडले गेले होते. त्यावेळी वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल व भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या दरम्यान एक मजेदार घटना घडली.
आयपीएल लिलावावेळी या लिलावाचे थेट प्रक्षेपण करत असलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कुंबळे व गेल हे एक्सपर्ट म्हणून सहभागी झालेले. गेल हा आपल्या मजेदार स्वभावासाठी ओळखला जातो. तसेच कुंबळे हे शांत व तितकेच परखडही आहेत. या लिलावावेळी बोलताना गेलने मजेत म्हटले,
“काही वेळा मी आयपीएलमध्ये अनलकी संघांचा भाग राहिलो आहे. तिथे अनिल माझ्यासोबत नव्हते. मात्र, जिथे आम्ही एकत्र होतो तिथून त्यांनी मला बाहेर काढले. आज कदाचित त्यामुळेच ते देखील येथे माझ्या शेजारी आहेत.”
गेल हा 2018 व 2019 या आयपीएल हंगामामध्ये पंजाब किंग्स संघाचा भाग होता. त्याचवेळी कुंबळे हे देखील संघाचे प्रशिक्षक होते. पंजाबसाठीच खेळत असताना गेल याला खराब कामगिरीमुळे आयपीएलमधून बाजूला व्हावे लागले. दुसरीकडे अनिल कुंबळे यांनी तब्बल पाच वर्ष पंजाब संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले. मात्र, एकदाही ते संघाला विजयी करू शकले नाहीत. याच कारणाने आयपीएल 2022 नंतर त्यांना आपल्या पदावरून हटवले गेले. सध्या ते समीक्षक व समालोचक म्हणून काम करतात.
(Chris Gayle Takes Dig On Anil Kumble In Live. Show)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या ‘या’ कृत्यावर संतापले चाहते, हार्दिकच्या व्हिडिओमुळे पेटला नवा वाद
डीन एल्गरला सांताकडून ‘गिफ्ट’! चेंडू स्टम्पला लागूनसुद्धा राहिला नाबाद, व्हिडिओ व्हायरल





