सचिन तेंडुलकर ,सौरव गांगुली ,महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंपाठोपाठ वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल इंडियन सुपर लीगच्या एखाद्या टीमचा सह संघमालक म्हणून आपणास दिसू शकतो.
या बाबत बोलताना ख्रिस गेल म्हणाला, ”मला इंडियन सुपर लीग सारख्या एखाद्या स्पर्धेत टीम घ्यायला नक्कीच आवडेल ,पण ते तेव्हाच उत्तम जमेल जेव्हा तुम्ही सक्रिय खेळाडू असताना या मध्ये सहभागी व्हाल.”
गेल पुढे म्हणाला की सचिन तेंडुलकर ,सौरव गांगुली या खेळाडूंनी टीम विकत घेतल्या आहेत कारण की त्यांना निवृत्तीनांतर जागतिक बिजनेसमध्ये टिकून राहायचे आहे.
”जेव्हा तुम्ही मोठया ब्रॅन्ड्सशी संलग्न असता तेव्हा, एक क्रिकेटर म्हणून तुम्हाला दुसऱ्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी करावे असे वाटत असते. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. ”असेही गेल पुढे म्हणाला.
जर ख्रिस गेल असा एखादा संघ विकत घेतला तर तो पहिलाच परदेशी क्रिकेटपटू ठरेल जो आयएसएलमध्ये संघ घेणारा क्रिकेटपटू ठरेल.