जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली. या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भारतातील असणारे जगातील सर्व क्रिकेटपटू पाहत असतात. खेळाडूंना सर्वाधिक रक्कम देखील याच लीगमध्ये खेळून मिळते. त्याचवेळी आयपीएलमध्ये मिळणाऱ्या पैशाचा खेळाडूंवर दबाव असतो, अशी कबुली दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ख्रिस मॉरिस याने दिली आहे.
एकवेळ आयपीएल गाजवलेला यशस्वी अष्टपैलू म्हणून मॉरिस याच्याकडे पाहिले जाते. चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, RCB व दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघासाठी खेळताना त्याने शानदार खेळ दाखवला होता. त्याचवेळी 2021 आयपीएलच्या लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू ठरलेला. तब्बल 16.25 कोटी इतकी रक्कम त्याला मिळाली होती. त्यानंतर दोन वर्षात तोच आयपीएलमधील सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरलेला.
सध्या आयपीएलमध्ये समालोचन करत असलेल्या मॉरिसला आपल्याला मिळालेल्याबद्दल विचारले असता तो म्हणाला,
“मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्यानंतर तुमच्याकडे एक मॅचविनर म्हणूनच पाहिले जाते. लोकांची नजर तुमच्यावर असते. तुमच्यावर त्या पैशाचा दबाव नक्कीच असतो. कधीकधी लोक वाट पाहत असतात की, तुम्ही अपयशी व्हाल आणि ते तुमच्याबद्दल लिहितील. मी नेहमी या दबावाचा आनंद घेतला. दबावच तुमच्याकडून चांगली कामगिरी करून घेत असतो.”
मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 2021 मध्ये 16 कोटींपेक्षा जास्तची बोली लावून संघात घेतल्यानंतर त्याची कामगिरी म्हणावी तशी झाली नव्हती. त्याने या संपूर्ण हंगामात 11 सामने खेळताना 25.60 अशा सरासरीने 15 बळी मिळवले होते. तसेच फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून 67 धावा निघालेल्या. या हंगामानंतर मॉरिस याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली.
(Chris Morris Said Everyone Feels Big Money Pressure In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट
तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून