---Advertisement---

…म्हणून जॉनी बेयरस्टोला विश्रांती देण्याचा निर्णय योग्य, इंग्लंडच्या प्रशिक्षकाने सांगितले कारण  

On: शुक्रवार, जानेवारी 29, 2021 4:23 PM
---Advertisement---

श्रीलंका दौरा आटोपल्यानंतर आता इंग्लंड संघ भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड भारताविरुद्ध कसोटी, टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात कसोटी मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीचा संघ जाहीर केला आहे. या संघातून धाकड फलंदाज जॉनी बेयरस्टो याला विश्रांती देण्यात आली आहे.

यानंतर इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र इंग्लंड संघाचे प्रशिक्षक क्रिस सिल्वरवुड यांनी बेयरस्टोला आराम देण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगत स्वत:च्या निर्णयाचा बचाव केला आहे.

इंग्लंड संघाचे यावर्षीचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. त्यांना या कॅलेंडर वर्षात १७ कसोटी सामने आणि आयसीसी टी२० विश्वचषक खेळायचा आहे. त्यानुसार इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने व्यस्त कार्यक्रमादरम्यान खेळाडूंना विश्रांती देण्याच्या योजनेचा हादेखील एक भाग असल्याचे सिल्वरवुड यांनी सांगितले आहे.

सिल्वरवुड म्हणाले की, “माझ्या मते बेयरस्टोने श्रीलंका दौऱ्यावर दमदार प्रदर्शन केले आहे. याविषयी बेयरस्टोने मला विचारले असता, मी त्याचे कौतुक केले होते. तो जरी पहिल्या दोन कसोटी सामन्यातून संघाबाहेर झाला असला; तरी तो लवकरच परत येईल आणि संघ निवडीसाठी उललब्ध राहील. मला वाटते की, बेयरस्टोने विश्रांती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. त्याचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. कारण तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात खेळणारा खेळाडू आहे. त्यामुळे आम्हाला त्याची काळजी घ्यावी लागणार आहे.”

भारताविरुद्ध कसोटीत केल्यात जवळपास ६०० धावा

इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज बेयरस्टो याने भारताविरुद्ध आजवर कसोटीत ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. २०१२ ते २०१८ या कालावधीत भारतीय संघाविरुद्ध बेयरस्टोने ११ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान ९३ धावांच्या सर्वोच्च खेळीसह त्याने ५९१ धावा केल्या आहेत.

फेब्रुवारीत सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका

भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होईल. पहिले दोन सामने ५ आणि १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार असून उर्वरित सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्या’ दोघांमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर करू शकलो खुलून फलंदाजी, चेतेश्वर पुजाराने उलगडले रहस्य

आर्चर म्हणतो, “भारतीय फिरकीपटूंनी आम्हाला हरवण कठीण, स्पिनर्सची आमच्याकडेही भरमार”

फ्लॅशबॅक! १५ वर्षांपूर्वी इरफान पठाणने पाकिस्तान विरुद्ध घेतली होती हॅट्रिक, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---