श्रीलंका क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय संपादन केला. त्यानंतर वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारतीय संघाला विजयश्री प्राप्त झाली. या सर्वसामान्यांमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका हा एकाकी झुंज देताना दिसत आहे. फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही विभागात त्याने शानदार कामगिरी करून दाखवली. त्यानंतर त्याच्या आयपीएल खेळणेविषयी आता श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
सोनाका भारतीय संघाविरुद्ध सध्या उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतोय. टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 27 चेंडूंवर 45 धावांची खेळी केलेली. पुणे येथील दुसऱ्या सामन्यात त्याने अवघ्या 22 चेंडूत 56 धावांची स्फोटक खेळी केलेली. तसेच अखेरच्या षटकात दोन बळीही घेत संघाला विजय मिळवून दिलेला.
त्यानंतर वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही तोच संघाचा एकटा शिलेदार ठरला. संघाचे इतर फलंदाज अपयशी ठरत असताना त्याने 88 चेंडूंवर नाबाद 108 धावा चोपल्या. त्याच्या याच फॉर्मनंतर श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड म्हणाले,
“शनाकाने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. मला विश्वास आहे की सर्व आयपीएल संघ त्याला पाहत असतील. त्याने आता स्वतःची किंमत वाढवली आहे. त्याला नक्कीच आयपीएलमध्ये संधी मिळेल.”
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानेदेखील म्हटले की, या मालिकेनंतर आयपीएलचा लिलाव असतात तर शनाकाने कोट्यावधींची रक्कम मिळवली असती. मागील महिन्यात झालेल्या आयपीएल 2023 लिलावात 50 लाख आधारभूत किंमत असलेल्या शनाकावर कोणीही बोली लावली नव्हती. मात्र, आता एखाद्या दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी त्याची निवड केली जाऊ शकते.
(Chris Silverwood Talk On Dasun Shanaka IPL Contract)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हद्दच केली! पायात चप्पल घालून शाकिब अल हसन खेळपट्टीवर, पंचांसोबत वाद घातल्यानंतर मोठी कारवाई
पक्की माहिती, पंत नाही खेळणार आयपीएल! सौरव गांगुलींनी केले स्पष्ट