भारत विरूद्ध न्यूझीलंड संघात (India vs New Zealand) संघात नुकतीच 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 3-0 ने दारूण पराभव केला. दरम्यान भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) दोघंही या मालिकेत पूर्णपणे फ्लाॅप ठरले. दरम्यान आता या दोन्ही दिग्गजांबद्दल भारताचा माजी दिग्गज खेळाडू क्रिस श्रीकांतने मोठे वक्तव्य केले आहे.
क्रिस श्रीकांतने आपल्या यूट्यूब शोमध्ये भविष्यवाणी करत सांगितले की, जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करत नसेल तर त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. तो म्हणाला, “आता प्रत्येकजण असा विचार करू लागला आहे की जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करू शकला नाही तर तो कदाचित कसोटी क्रिकेटला अलविदा करेल. रोहितने आधीच टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि कसोटी क्रिकेट सोडल्यानंतर तो फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळेल. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो आता जुन्या खेळाडूंमध्ये नाही हेही लक्षात ठेवावे लागेल.”
रोहित शर्माशिवाय क्रिस श्रीकांतने विराट कोहलीच्या (Virat Kohli) कारकिर्दीवर बरेच काही सांगितले. कोहली ऑस्ट्रेलियात चांगले पुनरागमन करेल, असा त्याला विश्वास आहे. श्रीकांत म्हणाला, “माझ्या मते, विराट कोहली ऑस्ट्रेलियात शानदार पुनरागमन करेल. ऑस्ट्रेलियात त्याला धावा करायला आवडतात, ही त्याची ताकद आहे. कोहलीने आता क्रिकेट सोडावे, असे म्हणणे कदाचित घाईचे आहे, मी त्यासाठी तयार नाही. निवृत्ती स्वीकारण्यासाठी कोहलीचा अजून बराच वेळ शिल्लक आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; संघाने रिलीज केल्यानंतर ‘या’ स्टार खेळाडूने अनफाॅलो करत फोटोही केले डिलीट
IND VS SA; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मध्ये शतक ठोकणारे भारतीय फलंदाज
भारताच्या पराभवानंतर अनोखी मागणी, टेस्ट फॉरमॅटमध्ये होणार बदल? भारतीय दिग्गजानी उठवला आवाज