आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतीच खेळाडूंची वैयक्तिक टी२० व वनडे क्रमवारी जाहीर केली. वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका व इंग्लंड विरुद्ध श्रीलंका या मालिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या नव्या क्रमवारीत फायदा झालेला दिसून आला. वेस्ट इंडीजचा सलामीवीर एविन लुईस व इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स यांनी या क्रमवारीत मोठी उसळी मारली.
या खेळाडूंना झाला फायदा
वेस्ट इंडीज विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान झालेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वेस्ट इंडीजच्या एविन लुईसला दोन स्थानांचा फायदा होऊन तो अव्वल १० फलंदाजात सामील झाला. याच मालिकेत अपयशी ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा वॅन डर डसेनला दोन स्थानांचे नुकसान झाले व तो आठव्या स्थानी घसरला.
फलंदाजांच्या पहिल्या पाच खेळाडूत काही बदल झाला नाही. भारतीय कर्णधार विराट कोहली व केएल राहुल या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये असणारे दोन भारतीय आहेत. त्यांचे अनुक्रमे पाचवे व सहावे क्रमांक लागतात.
गोलंदाजी क्रमवारीत झाली अदलाबदली
वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत बरेच बदल झालेले पाहायला मिळाले. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत आपल्या भेदक गोलंदाजीने श्रीलंकेला शरण येण्यास भाग पाडणार्या ख्रिस वोक्सने चार स्थानांची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम तिसरे स्थान पटकावले. वोक्सने अष्टपैलूंच्या क्रमवारीतही तिसऱ्या स्थानी उडी घेतली.
भारताच्या जसप्रीत बुमराह याला एका स्थानाचे नुकसान झाल्याने तो सहाव्या स्थानी घसरला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट या यादीमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे.
फलंदाजांची टी२० क्रमवारी-
डेव्हिड मलान- इंग्लंड
ऍरॉन फिंच- ऑस्ट्रेलिया
बाबर आझम- पाकिस्तान
डेवॉन कॉनवे- न्यूझीलंड
विराट कोहली- भारत
गोलंदाजीची वनडे क्रमवारी-
ट्रेंट बोल्ट- न्यूझीलंड
मेहदी हसन- बांगलादेश
ख्रिस वोक्स- इंग्लंड
मुजीब उर रहमान- अफगाणिस्तान
मॅट हेन्री- न्यूझीलंड
महत्त्वाच्या बातम्या –
विराटसेनेचं विश्वविजेता बनण्याचं स्वप्न होणार पूर्ण! मोठ्या खेळाडूने दिलाय मोलाचा कानमंत्र
श्रीलंका-भारत मालिकेआधी ‘हा’ दिग्गज घेऊ शकतो निवृत्ती