यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (३० ऑक्टोबर) आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांमध्ये पार पडलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलिया संघाला ८ गडी राखून पराभूत करत एकतर्फी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंड संघाने उपांत्य फेरी गाठण्याची दावेदारी आणखी मजबूत केली आहे. दरम्यान या सामन्यात ख्रिस वोक्सने अविश्वसनीय झेल टिपला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाला साजेशी सुरुवात करण्यात अपयश आले होते. सुरुवातीच्या १० षटकात ऑस्ट्रेलियाचे ४ मुख्य फलंदाज तंबूत परतले होते.
ख्रिस वोक्सने टिपला भन्नाट झेल
तर झाले असे की, स्टीव्ह स्मिथ स्ट्राइकवर असताना इंग्लंड संघाकडून तिसरे षटक टाकण्यासाठी ख्रिस जॉर्डन गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर ख्रिस जॉर्डनने ऑफ साईडच्या दिशेने शॉर्ट चेंडू टाकला, जो स्टीव्ह स्मिथने मिड ऑनच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि मिड ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या ख्रिस वोक्सने मागच्या बाजूला डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला व स्टीव्ह स्मिथला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यावर चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.
https://www.instagram.com/reel/CVp-FfLl5zh/?utm_medium=copy_link
इंग्लंड संघाचा जोरदार विजय
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर ऑस्ट्रेलिया संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, कर्णधार आरोन फिंचने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर ॲस्टोन एगरने २० आणि मॅथ्यू वेडने १८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला २० षटक अखेर १२५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाकडून जोस बटलरने सर्वाधिक ७१ तर जेसन रॉयने २२ आणि जॉनी बेअरस्टोने नाबाद १६ धावांची खेळी करत इंग्लंड संघाला हा सामना ८ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ मध्ये ४ खेळाडूंना रिटेन केल्यास फ्रँचायजींना मोजावे लागणार ‘इतके’ कोटी, वाचा
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचा विश्वविक्रम, बनला एका वर्षात सर्वाधिक टी२० विकेट्स घेणारा गोलंदाज