---Advertisement---

इंग्लंड संघाची या महत्त्वाच्या टी२० मालिकेसाठी घोषणा, ६ वर्षांनंतर ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन

On: रविवार, जून 13, 2021 5:22 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ जास्त दूर नाही आहे. सर्व संघ टी-२० विश्वचषकाच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे अगामी काळात अनेक संघ टी२० मालिका खेळताना दिसणार आहे. नुकतेच मायदेशात श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे , त्यात एक खेळाडू २०१५ नंतर टी२० संघात पुनरागमन करत आहे.

इंग्लंडने जाहीर केला श्रीलंका दौऱ्यासाठी संघ
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड ( ईबीसी ) ने श्रीलंका दौऱ्यासाठी आपल्या संघ जाहीर केला आहे. एकदिवसीय संघातील नियमित खेळाडू क्रिस वोक्स आणि डेविड विलीचा संघात समावेश करण्यात आला आहे. आश्चर्यचकित करणारे आहे आहे की क्रिस वोक्सने अखेरचा टी२० सामना इंग्लंडकडून नोव्हेंबर २०१५ मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळला होता, तर विलीने मे २०१९ पासून या क्रिकेटच्या स्वरूपात राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले नाही.

डाव्या हाताचा फिरकीपटू लियाम डॉसन, जो २०१८ पासून एकही टी२० मध्ये खेळला नाही, त्याला संघातील तीन फिरकीपटू म्हणून निवडण्यात आले आहे. दरम्यान, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि रीस टोपली यांना दुखापतीतून सावरत असल्याने संघात स्थान देण्यात आलेले नाही.

इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ” टी२० विश्वचषक अवघ्या काही महिन्यांनंतर आहे. उन्हाळी हंगाम आम्हाला संघात सुधारणा आणि मैदानावर प्रगती सुरू ठेवण्यासाठी मदद करेल. आम्हाला मोठ्या संख्येने खेळाडूंसह प्रत्येक मालिकेत पोहोचण्याची इच्छा आहे. प्रत्येक सामना जिंकणे आणि मोठ्या स्पर्धेच्या जवळ जाईपर्यंत उत्तम तयारी करण्याचे आमचे लक्ष्य आहे . ख्रिस वोक्स आणि डेव्हिड विली हे खूप अनुभवी क्रिकेटपटू आहेत आणि हे दोघेही संघात असणे खूप आनंददायक आहे आणि यामुळे आमच्याकडे असलेल्या संघाची खोली किती आहे हे दर्शविते.”

आश्चर्यकार्यक आहे की इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेचे पहिले दोन सामने अनुक्रमे २३ आणि २४ जून रोजी कार्डिफमध्ये खेळले जातील, तर तिसरा आणि शेवटचा सामना २६ जूनला साऊथॅम्प्टन येथे खेळला जाईल. त्यानंतर वनडे मालिका होणार आहे.

इंग्लंड टी२० संघः ओएन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, टॉम करन, लियाम डॉसन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

महत्वाच्या बातम्या

दुर्लक्ष, फक्त दुर्लक्ष! श्रीलंका दौऱ्यावरही निवड न झाल्याने उनाडकटने उचलले ‘मोठे पाऊल’

SLvIND: संघनायकाची दिव्यदृष्टी! संजूने फारपुर्वीच केली होती त्याच्या सहकाऱ्याच्या निवडीची भविष्यवाणी

‘जेंटलमेन गेम’ची नाचक्की! शाबिकपुर्वी ‘या’ स्टार क्रिकेटपटूंचाही लाईव्ह सामन्यात सुटलाय संयम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---