इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेचा चौथा सामना मॅनचेस्टरमध्ये खेळला जात आहे. मॅनचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवसी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलिया सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने 90.2 षटकात 317 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. मिचेल स्टार्क 36 धावांसह खेळपट्टीवर नाबाद राहिला.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स (Chris Woakes) लीड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या ऍशेस कसोटी चमकदार कामगिरी करताना दिसला होता. त्याने मॅनचेस्टनरमध्येही आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली आणि पहिल्या डावात विकेट्सचे पंचक घेतले. या पाच विकेट्स घेण्यासाठी त्याने 22.2 षटकात 62 धावा खर्च केल्या. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने 2 विकेट्स घेतल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 600 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला. जेम्स अँडरसन, मार्क वुड आणि मोईन अली यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
Christopher Roger Woakes ❤
Special stuff from our Woakesy 👏
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | @chriswoakes pic.twitter.com/N9sl0y8kyo
— England Cricket (@englandcricket) July 20, 2023
ऑस्ट्रेलियन संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागली. पहिल्या डावात मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांनी अर्धशतके केली. दोघांनी 51-51 धावांवर विकेट गमावल्या. ट्रेविस हेड याचे अर्धसतक अवघ्या दोन धावांनी हुकले. सलामीवीर अस्मान ख्वाजा अवघ्या 3 धावांवर बाद झाला.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेविड वॉर्नर देखील मोठी खेळी करू शकला नाही. त्याने वैयक्तिक 32 धावा करून विकेट गमावली. स्टीव स्मिथकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या, पण तोदेखील 41 धावा करून तंबूत परतला. कॅमरून ग्रीन 16, तर यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरे अवघ्या 20 धावांवर तंबूत परतले. गोलंदाजी अष्टपैलू मिचेल स्टार्क 36 धावांसह खेळपट्टीवर शेवटपर्यंत टिकून राहिला. पण तळातील फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाहीत. कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर वैयक्तिक 1 धाव करून बाद झाला. तसेच 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला जोश हेजलवूडने 4 धावा केल्या. (Chris Woakes took five wickets to bowl out Australia for 317 in the first innings of the Manchester Test.)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
मोईन अलीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला लॅब्यूशेन, चेंडू मिस करताच झाला मोठा गेम, पाहा व्हिडिओ
श्रीलंकेत जाऊन पाकिस्तानने जिंकली पहिली कसोटी, भारत-इंग्लंडच्या विक्रमाला तडा