---Advertisement---

सिटी क्लब, ,स्निग्मय एफसी, कमांडोजचे संघर्षपूर्ण विजय

On: शनिवार, जून 25, 2022 8:28 PM
Pune-Football-1
---Advertisement---

सिटी क्लब, कमांडोज आणि स्निग्मय एफसी संघांनी संघर्षपूर्ण विजयासह पीडीएफए फुटबॉल लीगमध्ये प्रथम श्रेणीत आपली आगेकूच कायम राखली.

सिटी स्पोर्टस एरिना येथे झालेल्या सामन्यात सिटी क्लबने व्हिन्सेंटस ओल्ड बॉईजचा २-१ असा पराभव केला. रुबेन लोबो याने ३९व्या मिनिटाला गोल करून व्होबाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उत्तरार्धापर्यंत त्यांनी ती कायम राखली होती. अखेरीस ५३व्या मिनिटात लिऑन नायर आणि ७८व्या मिनिटाला ग्लेन संजय यांनी गोल करून सिटीचा विजय साकार केला.

सामन्याच्या ४८व्या मिनिटाला सुमित भंडारीने केलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर स्निग्मय एफसी संघाने ब गटात शहर पोलिस संघाचा १-० असा पराभव केला.

तिसऱ्या सामन्यात कमांडोज अ संघाने अनिकेत पवार याने ५८ आणि ६८व्या मिनिटांत केलेल्या गोलच्या जोरावर सी गटातून एआयवायएफए स्काय हॉक्स संघावर २-० असा विजय मिळविला.

एसएसपीएमएस मैदानावर, स्पोर्टिव्ह एफएने रायन स्पोर्ट्सचा 1-0 असा पराभव केला आणि सोहम शिंदे याने आठव्या मिनिटाला गोल केला.

निकाल –

सिटी स्पोर्ट्स एरिना, मोशी – प्रथम विभाग

गट अ – सिटी क्लब : 2 (लिओन नायर 53वे, ग्लेन संजय 78वे मिनिट) वि.वि. व्हिन्सेंट्स ओल्ड बॉइज असोसिएशन (व्होबा) : 1 (रुबेन लोबो 39वे मिनिट)

गट ब – स्निग्मय एफसी: 1 (सुमित भंडारी 48वे मिनिट) वि.वि. शहर पोलीस : 0

गट सी : कमांडोज ‘अ’: २ (अनिकेत पवार ५८ आणि ६८वे मिनिट) वि.वि. एआयवायएफए स्काय हॉक्स : ०

एसएसपीएमएस मैदानावर – १४ वर्षांखालील

ग्रीनबॉक्स चेतक एफए 3 (युवराज देशमुख 8 आणि44वे मिनिट,सोहम वैद्य 20वे मिनिट) वि.वि. यंग स्टेप्स: 1 (फरान शेख 27वे मिनिट)

स्पोर्टिव्ह एफए 1 (सोहम शिंदे 8वे मिनिट) वि.वि. रायन स्पोर्ट्स : 0

बार्का अकादमी : ४ (राजवीर चव्हाण २रे आणि ४४वे मिनिट, रेहान खान ३३वे, इशान जाधव ४८वे मिनिट) वि.वि. स्पोर्टिगो: १ (वरद ठाकूरदेसाई ८वे मिनिट)

दुर्गा एफए : २ (आकाश सिंग ३४वे मिनिट, विनायक यादव ४०वे मिनिट) वि.वि. उत्कर्ष क्रीडा मंच: १ (कार्तिक ठाकुर १५वे मिनिट)

डेक्कन इलेव्हन : 6 (अमेय देशपांडे 4थे, 23वे आणि ३७वे मिनिट, विहान हर्डीकर 6वे, स्वराज किर्वे 43 आणि 49वे मिनिट) वि.वि. सनराईज स्पोर्ट्स क्लब : 0

मॅथ्यू एफए : 1 (यश देठे 16वे मिनिट) वि.वि. दिएगो ज्युनियर्स : 0

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

श्रीलंकेच्या फॅन्सचा नाद खुळा, ऑस्ट्रेलिया टीमला केला खास सपोर्ट

‘त्या’ एतिहासिक सामन्याचे तिकीट पाहून कपिल देव भावुक

रणजी ट्रॉफी: अंतिम सामन्यात चौथ्या दिवशीही मध्य प्रदेश पडतोयं मुंबईवर भारी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---