पुणे। जाएंटझ अ आणि स्निग्मय एफ.सी. संघांनी सहज विजयासह सिटी कप २०२१ बाद फेरी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा पुण्यातील मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे सुरु आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जाएंटझ अ संघाने दहा गोलच्या सामन्यात बोपोडी एफ.सी. संघाचा ७-३ असा पराभव केला. पूर्वार्धात अभिजित धनवडे (१३वे, ३०वे मिनिट) याच्या दोन गोलच्या जोरावर जाएंटझ अ संघाने मध्यंतराला ३-० अशी आघाडी घेतली होती. तिसरा गोल कपिल पाचपिंडे याने १४व्या मिनिटाला केला.
उत्तरार्धात निशांतने गोल धडाका लावला होता. त्याने ४३व्या मिनिटाला वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथा गोल केला. त्यानंतर चार मिनिटांत त्याने आणखी दोन गोल केले. त्याने दुसरा गोल ७०व्या, तर तिसरा गोल ७३व्या मिनिटाला केला. विजयी संघाचा सातवा गोल अभिजीतने ४५व्या मिनिटाला केला. पराभूत बोपोडी एफ.सी. संघाकडून रॉनी रोझारियो (४४वे), स्टिफन के. (४७वे) आणि रोहित क्षिरसागरने ६२व्या मिनिटाला गोल केला.
दुसऱ्या सामन्यात स्निग्मन एफ.सी. संघाने इन्फंटस एफ. सी. संघाचा ५-० असा पराभव केला. प्रतिक साबळे याने १४ आणि ६८व्या मिनिटाला गोल केले. अन्य तीन गोल सुबोध लामा (४१वे), सुमित भंडारी (५८वे मिनिट) आणि प्रतिक पाटिल (६६वे मिनिट) यांनी केले.
निकाल –
जाएटंझ अ ७ (अभिजित धनवडे १३वे, ३०वे, कपिल पाचुपिंडे १४वे, निशांत एम. ४३वे, ६९वे, ७०+३ वे मिनिट, अभिजित एम. ४५वे मिनिट) वि.वि. बोपोडी एफ.सी. ३ (रॉनी रोझारियो ४४वे, स्टिफन के. ४७वे, रोहित क्षीरसागर ६२वे मिनिट)
स्निग्मय एफ.सी. ५ (प्रतिक साबळे १४, ६८वे मिनिट, सुबोध लामा ४१वे, सुमित भंडारी ५८वे, प्रतिक पाटिल ६६वे मिनिट) वि.वि. इन्फंटस एफ.सी. – ०