---Advertisement---

ऍस्पायर चषक फुटबॉल स्पर्धेत सिटी एफसी अन् सनी डेज संघांची आगेकूच

On: बुधवार, मे 10, 2023 5:41 PM
Aspire-Cup-Football
---Advertisement---

सिटी एफसी, पुणे आणि सनी डेज संघांनी चमकदार विजयासह ऍस्पायर चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ऍस्पायर इंडियाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील संघांसाठी ही स्पर्धा असून, सामने पिंपरी येतील हेडगेवार मैदानावर खेळवले जात आहेत.

आक्रमक खेळाडू सात्विक नायकने (१४ वे आणि १५वे मिनिट) पूर्वार्धात दोन मिनिटांत नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर सिटी एफसी संघाने खडकी ब्ल्यूजचा २-० असा पराभव केला.

त्यापूर्वी, झालेल्या सामन्यात सनी डेज संघाने नियोजित वेळेतील गोलशून्य बरोबरीनेतर टायब्रेकरमध्ये केशव माधव प्रतिष्ठान संघाचा ४-२ असा पराभव केला. नियोजित वेळेत सनी डेजने सामन्यात काही वेळा चांगली आक्रमणे केली. पण, पूर्ण पणे बचावात्मक खेळ करणाऱ्या केशव माधव प्रतिष्ठानविरुद्ध त्यांना गोल करण्यात अपयश आले.

शूट आऊट मध्ये सनी डेजकडून विशाल बेनवंश, सुंदर वेळू, शुभम टेंभुर्णी, संदीप खुटे यानी गोल केले. पराभूत संघाच्या अद्वैत काळभोर, अभिषेक पाध्ये यांनाच गोल करण्यात यश आले.

अन्य एका सामन्यात नव महाराष्ट्र संघाला पूना सोशल स्पोर्ट्स क्लबने पुढे चाल दिली.

निकाल-
१) सनी डेज ० (४) (विशाल बेनवंश, सुंदर वेळू, शुभम टेंभुर्णे, संदीप खुटे) वि.वि. केशव माधव प्रतिष्ठान ० (२) ( अद्वैत काळभोर, अभिषेक पाध्ये)

सिटी एफसी पुणे २ (सात्विक नायक १४वे, १५वे मिनिट) वि.वि. खडकी ब्ल्यूज ०

नव महाराष्ट्र पुढे चाल वि. पूना सोशल स्पोर्ट्स क्लब

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सांगवी एफ.सी., नॉईझी बॉईजचा सहज विजय, एबीसी संघाला विजयासाठी करावा लागला संघर्ष
सुपर कप 2023: चेन्नईयन एफसीचे उपांत्य फेरीचे लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---