---Advertisement---

पुरुषांच्या वनडे सामन्यात अंपायरिंग करणारी ती बनली पहिला महिला…

On: शनिवार, एप्रिल 27, 2019 4:09 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाची क्लेअर पोलोसॅक ही पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणारी पहिला महिला ठरली आहे. तिने आज(27 एप्रिल) वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन 2 मध्ये होत असलेल्या नामीबिया विरुद्ध ओमान संघातील सामन्यात पंच म्हणून मैदानावर येताच हा इतिहास रचला आहे.

क्लेअरने आत्तापर्यंत महिलांच्या 15 वनडे सामन्यात अंपायरिंग केली आहे. तसेच यापूर्वी ती 2017 मध्ये ऑस्ट्रेलियातील जेएलटी कप या पुरुषांच्या देशांतर्गत स्पर्धेत अंपायरिंग करणारी पहिली महिला ठरली होती.

त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये तिने एलोइस शेरीडेनसह महिला बीग बॅश लीगमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध मेलबर्न स्टार यांच्यातील सामन्यात अंपायरिंग केली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये व्यावसायिक क्रिकेट सामन्यात मैदानावरील दोनही महिला पंच असण्याची पहिलीच वेळ होती.

क्लेअर यांनी 2016 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात झालेल्या सामन्यात पहिल्यांदा अंपायरिंग केले होती. तसेच इंग्लंड विरुद्ध भारतीय महिला संघात झालेल्या महिला टी20 विश्वचषकातील उपांत्य फेरीतही त्यांनी पंच म्हणून काम पाहिले होते.

याबरोबरच 2017 मध्ये पार पडलेल्या महिला वनडे विश्वचषकातही क्लेअर यांनी 4 सामन्यात अंपायरिंग केले आहे.

आज घडवलेल्या इतिहासाबद्दल क्लेअर म्हणाली, ‘पुरुषांच्या वनडे सामन्यात अंपायरिंग करणारी पहिली महिला बनल्याने मी उत्सुक आहे. मी पंच म्हणून किती दूरपर्यंत आले आहे. वास्तवात महिला पंचांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे.’

‘असे कोणतेही कारण नाही की महिला क्रिकेटमध्ये पंच होऊ शकत नाही. अडथळे दूर करणे आणि जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे असून त्यामुळे जास्तीत जास्त महिला या भूमिका पार पाडू शकतील.’

ती पुढे म्हणाली, ‘अंपायरिंग हा सांघिक प्रयत्न आहे. मी ज्या पंचांबरोबर काम केले, माझे स्थानिक अंपायर असोसिएशन एनएसडब्ल्यू आणि स्कोअरर्स असोसिएशनचे आभार मानते. त्याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलिया, माझे कुटुंब आणि सहकाऱ्यांचेही आभार मानते. त्यांच्या पाठिंब्याशियाय आजचा सामना शक्य नव्हता.’

क्लेअरबद्दल आयसीसीचे अंपायर आणि रेफ्री व्यवस्थापक एड्रियान ग्रिफिथ म्हणाले, ‘पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट सामन्यात अंपायरिंग करणारी पहिला महिला बनल्याबद्दल अभिनंदन. तिच्या मेहनतीमुळे आणि दृढनिश्चयामुळे ती यासाठी पात्र आहे.’

‘ती अशा महिलांसाठी आदर्श आहे, ज्या महिलांना अधिकारी बनायचे आहे आणि स्वत:ला सिद्ध करायचे आहे. त्यांना योग्य मार्ग आणि संधी मिळाली तर त्या यशस्वी होऊ शकतात, हे तीने दाखवले आहे.’

महत्त्वाच्या बातम्या –

रोहित शर्माचा मोठा खूलासा, या कारणामुळे चेन्नई सुपर किंग्सचा झाला पराभव

चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत पाचव्यांदाच घडली अशी गोष्ट

हार्दिक पंड्या पाठोपाठ १७ वर्षीय रियान परागनेही मारला हॅलिकॉप्टर शॉट, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment