---Advertisement---

AUS v IND : पुरुषांच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच महिलेने केले अंपायरींग, सिडनीत रचला इतिहास

On: गुरूवार, जानेवारी 7, 2021 10:57 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा तिसरा कसोटी सामना सिडनी येथे सुरू आहे. या सामन्यामध्ये क्लेयर पोलोसाक ही महिला अंपायरींग करीत आहे. याचबरोबर पोलोसाकने इतिहास घडवला असून पुरुषांच्या कसोटी सामन्यात अंपायरींग करणारी ती पहिलीच महिला ठरली आहे. पोलोसाक ही फोर्थ अंपायरची भूमिका बजावत आहे.

क्लेयर पोलोसाकने यापूर्वी पुरुषांच्या वनडे क्रिकेट सामन्यात अंपायरींग केले आहे. पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये देखील अंपायरींग करणारी ती पहिलीच महिला ठरली होती. 32 वर्षीय पोलोसाकने 2019 साली नामीबिया आणि ओमान दरम्यानच्या पुरुषांच्या वनडे सामन्यात अंपायरींग केली होती.

सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पोलोसाक फोर्थ अंपायर असून, पॉल रिफेल आणि पॉल विल्सन मैदानावरील अंपायर आहेत. तसेच ब्रूस ऑक्सेनफोर्ड तीसरे (टेलीविजन) अंपायर आहेत.

फोर्थ अंपायरही महत्त्वाचा

फोर्थ अंपायर देखील सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मैदानावर नवीन चेंडू आणणे , अंपायरांसाठी ड्रिंक्स आणणे, लंच आणि चहाच्या ब्रेकदरम्यान खेळपट्टीची देखभाल करणे तसेच लाईट मीटरद्वारे मैदानात खेळासाठी अनुकूल प्रकाश असल्याची तपासणी करणे, ही महत्त्वाची कामे फोर्थ अंपायरला पार पाडावी लागतात. काही परिस्थितीत जर मैदानावरील अंपायर सामना सोडून गेले तर थर्ड अंपायर मैदानावर अंपायरींग करतात व फोर्थ अंपायरला तिसऱ्या अंपायरची भूमिका पार पाडावी लागते.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ : राष्ट्रगीत सुरु असतानाच मोहम्मद सिराज झाला भावूक; अश्रूही झाले अनावर

‘धोकादायक’ डेविड वॉर्नरला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने केले जोरदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ

नवदीप सैनीने केले आपले कसोटी पदार्पण, ‘या’ दिग्गजाकडून मिळाली कॅप

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---