---Advertisement---

“जस्टिन लँगर अतिशय कठोर प्रशिक्षक”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे भाष्य

On: सोमवार, फेब्रुवारी 1, 2021 11:39 PM
---Advertisement---

भारतीय संघाविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघातील अंतर्गत कलह आता समोर येत आहे. यापूर्वी कर्णधार टीम पेनला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुण हटविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यांनतर आता मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या कार्यशैलीबद्दल खेळाडू नाराज असल्याचा एक रिपोर्ट समोर आला. आता यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने भाष्य केले आहे.

“जस्टिन लँगर अतिशय कठोर प्रशिक्षक”

मायकेल क्लार्कने जस्टिन लँगर यांच्याबाबत सांगताना म्हंटले की, “लँगर एक खेळाडू म्हणून आणि प्रशिक्षक म्हणून देखील अतिशय कठोर आणि शिस्तप्रिय आहे. लँगर हे खेळाडूंनी आपल्यापुढील प्रत्येक आव्हानाचा यशस्वीरीत्या सामना केला पाहिजे, याबाबत आग्रही असतात. खेळाडूंनी सर्वश्रेष्ठ स्तरावर यशस्वी व्हावे, यासाठी ते कडवी मेहनत घ्यायला भाग पाडतात. परंतु त्यांचे हे अति कठोर असणे, ऑस्ट्रेलियन संघातील अनेक खेळाडूंना आवडत नाही.”

पुढे बोलताना क्लार्क म्हणाला की, “काही खेळाडूंना सलग चार तास सराव करणे आवडत नाही, तर काही खेळाडूंना सततच्या टीम मिटिंगचा तिटकारा असू शकतो. त्यामुळे लँगर यांची शैली सगळ्याच खेळाडूंना पसंत पडते, असे नाही. मात्र ती लँगर यांची पद्धत असल्याने आपल्याला स्वीकारावी लागेल.”

मात्र खेळाडूंनी याबाबत तक्रारी केल्याचे वृत्त अफवाच आहे, असे मत क्लार्कने मांडले. खेळाडूंना काही तक्रारी असतील तर ते थेट कर्णधाराशी किंवा प्रशिक्षकांशी संवाद साधतील. त्यामुळे या सगळ्या अफवाच आहेत, असे क्लार्क म्हणाला.

महत्वाच्या बातम्या:

आयएसएल २०२०-२१ : ओदीशाला हरवून जमशेदपूरच्या आशा कायम

भारत-इंग्लंड मालिकेचे प्रसारण करण्यासाठी पुढे आला हा समूह

तमिळनाडू संघाचा स्पेशल डान्स, दिनेश कार्तिकने इंस्टाग्रामवरून शेअर केला व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---