पाकिस्तान क्रिकेट संघाला त्यांच्याच देशात वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. ८ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेच्या आधी पाकिस्तान संघातील एक वाद समोर आला आहे. हा वाद संघाचा कर्णधार बाबर आजम आणि मुख्य निवडकर्ते मोहम्मद वसीम यांच्यात सुरू आहे.
बाबर आजम (Babar Azam) आणि मोहम्मद वसीम (Mohammad Wasim) यांच्यातील हा वाद शान मसूद (Shan Masood) खेळाडूमुळे सुरू झाला आहे. पाकिस्तान संघाचा महत्वाचा खेळाडू शान मसूनच्या फलंदाजी क्रमावरून बाबर आणि वसीम आमने- सामने आल्याचे दिसत आहे. या मुद्यावर दोघांची मते भिन्न असल्याचे उघड झाले आहे.
नुकतेच वसीमने एका युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “मी शानला सांगितले आहे की, त्याने मध्यक्रमात फलंदाजी केली पाहिजे. यामुळे आमच्याकडेही लोकांना सांगण्यासाठी पुरावा असेल की, शानने आपल्यासाठी काहीतरी बदल केला आहे.” दरम्यान, शान पाकिस्तान संघाचा वरच्या फळीतील फलंदाज आहे. त्याने काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये टी-२० ब्लास्ट लीगमध्ये अप्रतिम फलंदाजी करून दाखवली. डर्बीशायर संघासाठी त्याचे प्रदर्शन महत्वपूर्ण ठरले.
वसीमला इच्छा जरी असली की, शानने मध्यक्रमात फलंदाजी करावी, पण बाबरला मात्र तसे वाटत नाही. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाबरने वसीमला एकप्रकारे प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषदेत तो म्हणाला की, “शान समूद वरच्या फळीत फलंदाजी करत आला आहे. त्याने खालच्या फळीत कधीच फलंदाजी केलेली नाही. मला वाटते की, जर शानला ५ किंवा ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करायला लावली, तर हे त्याच्यासाठी योग्य नसेल. आमचे या मुद्यावर लक्ष आहे. परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.”
शान मसूदने टी-२० ब्लास्टमध्ये धमाकेदार प्रदर्शन केलेच, पण पाकिस्तान सुपर लीगमध्ये देखील त्याने यावर्षी जबरदस्त फलंदाजी केली होती. पीएसलच्या या हंगामात त्याने मुल्तान सुल्तानसाठी खेळला. हंगामात खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये त्याने ४७८ धावा केल्या. या प्रदर्शनानंतर त्याला पाकिस्तान संघात संधी मिळण्यासाठी मागणी सुरू झाली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नदालने १४व्यांदा मारली French Openच्या फायनलमध्ये धडक, तरीही का झाला निराश?, कारण खूपच धक्कादायक
पाहावे ते नवलंच! पहिल्यांदाच क्रिकेटच्या इतिहासात पाहायला मिळाला भन्नाट शॉट, समालोचकही पडले कोड्यात
कुठपर्यंत जाईल ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिकची कारकीर्द? पाहा भारतीय दिग्गजाने काय केलीय भविष्यवाणी