पंजाबच्या मोगामध्ये आयसीसी टी20 विश्वचषकामध्ये इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (ENGvPAK) यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यावरून विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. कॉलेजमध्ये जम्मू-काश्मिर आणि बिहारच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावेळी दगड-विटांचीही फेक करण्यात आली. तो वाद इतका पेटला की दोन्ही ग्रुपमध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये अनेकजण जखमी झाले. ही घटना लाला लजपत राय कॉलेजमध्ये घडली.
टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा अंतिम सामना हॉस्टेलचे जवळपास 70-80 विद्यार्थी पाहत होते. सामन्यादरम्यान जेव्हा दोन्ही संघामध्ये विजय-पराभवाचे पारडे कधी इकडे तर कधी तिकडे झुकत होते, तेव्हाच जम्मू-काश्मिर आणि बिहारच्या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ माजली. हा वाद धार्मिक टीका केल्याने निर्माण झाला असे समोर येत आहे. हॉस्टेलच्या बाहेर विद्यार्थ्यांनी दगडफेकही केली, ज्यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर पोलिस तेथे पोहोचले आणि विद्यार्थ्यांचे विधान नमूद करून घेतले. या कॉलजेमध्ये 900-1000 विद्यार्थी असून त्यातील जवळपास 500 विद्यार्थी जम्मू-काश्मिरचे आहेत.
Clashes broke out at hostel in Moga, Punjab yesterday after T20 Final between Pakistan and England when Kashmiri Students raises Pro-Pakistan Slogans.
Atlast Bihari Students taught them a good lesson 🇮🇳💪
Police deployed to control situation. pic.twitter.com/e4k1DIgaIF
— Muktanshu™ 🆇 (@muktanshu) November 14, 2022
यावर कॉलेजने आणि पोलिसांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती जम्मू-काश्मिरच्या विद्यार्थी संघटनेने ट्विट करत केली. त्यामध्ये लिहिले, ‘आम्ही एसएसपी मोगा पंजाब गुलनीत एस खुराणा जी यांच्याशी बोललो; त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आणि मोगा येथे काश्मिरी विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या अशा भयंकर घटनेची दखल घेण्याची विनंती केली. त्यांनी आश्वासन दिले आहे की संबंधित लोकांवर कारवाई केली जाईल आणि 5 जणांना ताब्यात घेतले आहे. विद्यार्थ्यांना लवकरच सोडण्यात येईल.’
We have Spoken to SSP Moga Punjab @gulneets Ji; requestd him to intervene in this Matter & to take cognizance of such gory incident happened in Moga With Kashmiri students. He hs assurd that action will be takn against involvd people & 5 detaine students will be releasd shortly.
— J&K Students Association (@JKSTUDENTSASSO) November 13, 2022
टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने शान मसूद (Shaan Masood) याच्या 38 धावांच्या जोरावर 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावसंख्या उभारली. हे लक्ष्य इंग्लंडने 19व्या षटकातच पार केले. इंग्लंडकडून बेन स्टोक्स (Ben Stokes) याने नाबाद 52 धावांची विलक्षण खेळी केली. यासाठी त्याने 49 चेंडूंचा सामना करत 5 चौकार आणि एक षटकार मारला. गोलंदाजीतही इंग्लंडच्या खेळाडूंनी कमाल केली. सॅम करन (Sam Curran) याने 4 षटकात 12 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. आदिल रशिद आणि क्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. Clashes and stone pelting between two groups of students in Punjab over England-Pakistan T20 WC final match
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जाफर रॉक्स! धोनीच्या डायलॉगचा वापर करत केला पाकिस्तानचा अपमान, चाहते झाले लोटपोट
आयसीसीने जाहीर केला टी20 विश्वचषकाचा सर्वोत्तम संघ, भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंचा समावेश