रशियातील फिफा विश्वचषकानंतर फुटबॉलमधील मोठी स्पर्धा ला लीगा ही 19 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अॅटलेटिको माद्रिद विरुद्ध वॅलेंसिया यांच्यात होणार आहे.
रॉयल स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने(आर एफ इ एफ) 2018-19च्या या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यातील रियल माद्रिद विरुद्ध बार्सिलोनाचे सामने 28 ऑक्टोबर आणि 3 मार्चला होणार आहेत.
मागील सहा ला लीगा स्पर्धामध्ये बार्सिलोनाने चार तर रियलने एकदाच विजेतेपद पटकावले आहे.
ला लीगा आणि कोपा डेल रेचा विजेता बार्सिलोना 12 ऑगस्टला सेविल्ला तर 19 ऑगस्टला डेपोर्टीवो अलावेस विरुद्ध भिडणार आहे.
तर रियलचा संघ क्रिस्तियानो रोनोल्डो विना आणि नवीन प्रशिक्षकाबरोबर खेळणार आहे. झिनेडाइन झिडने यांच्यानंतर ज्युलेन लोपेतेंगुई हे रियलचे नवीन प्रशिक्षक आहेत.
रियल 30 सप्टेंबर, 2018 आणि 10 फेब्रुवारी, 2019ला परंपरागत शत्रू अॅटलेटिको माद्रिद खेळणार आहेत.
हुएस्का फुटबॉल क्लब पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणार आहे. तसेच या लीगचे शेवटचे सामने 19 मे, 2019ला खेळले जाणार आहे.
तर कोपा डेल रे चा अंतिम सामना 25 मे, 2019ला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडूंच्या नामांकनात फक्त एकच डिफेंडर
–फिफाच्या बेस्ट प्लेअर २०१८च्या यादीत ह्या मोठ्या खेळाडूचे नावच नाही