भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या मिताली राज आणि महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणामुळे आता पोवार यांच्या प्रशिक्षक करार वाढवण्यात येणार नसल्याचेही जवळ जवळ पक्के झाले आहे.
त्यामुळे बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नवीन अर्ज मागवल्याचीही चर्चा आहे. तसेच इएसपीएन क्रिकइम्फोच्या वृत्तानुसार सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांचा समावेश असणाऱ्या क्रिकेट सल्लागार समितीने(CAC) भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करावी अशी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या क्रिकेट समीतीची(CoA) इच्छा आहे.
मात्र क्रिकेट सल्लागार समिती सध्या अस्तित्वात आहे की नाही याबद्दल साशंकता आहे. या समीतीने मागील वर्षी रवी शास्त्री यांची भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली होती.
तसेच याच सल्लागार समीतीने 2016 मध्ये अनील कुंबळेचीही भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली होती. पण 2017 नंतर या सल्लागार समीतीला कोणतीही शिफारशी विषयी विचारण्यात आलेले नाही. पण त्यांना भारतीय महिला संघासाठी प्रशिक्षकाची नेमणुक करण्यासाठी विचारले जाण्याची शक्यता आहे.
महिला भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक हा पोवार यांची जागा घेईल. या पदासाठी अर्जदाराला काही अटीही असणार आहेत. जसे प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 60 पेक्षा जास्त नसावे तसेच त्याला आंतरराष्ट्रीय संघाचे किमान 1 वर्ष किंवा एखाद्या टी20 संघाचे किमान 2 वर्ष प्रशिक्षकपद सांभाळण्याचा अनुभव असला पाहिजे.
या महिला भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षकपदासाठी दाव व्हाटमोरे, व्यंकटेश प्रसाद आणि टॉम मुडी हे प्रबळ दावेदार आहेत.
–किंग कोहलीचा निर्धार पक्का, मालिका जिंकणारच
–तो खास पराक्रम करण्यासाठी बांगलादेशला खेळावे लागले तब्बल ११२ कसोटी सामने