पाकिस्तानचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारताविरुद्धच्या सामन्यातील पराभव निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानचा संघ खूप दबावात आला होता.
टी20 विश्वचषक 2024 चा 19वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं फलकावर 119 धावा लावल्या होत्या, या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानची धावसंख्या एकेकाळी 13 षटकांनंतर 2 विकेट गमावून 73 एवढी होती. असं असूनही पाकिस्तानचा पराभव झाला. बाबर आझमच्या संघाला निर्धारित 20 षटकात केवळ 113 धावाच करता आल्या. या पराभवासह पाकिस्तानचा टी20 विश्वचषकातील प्रवास जवळपास संपला आहे.
या पराभवानंतर बोलताना गॅरी कर्स्टन म्हणाले, “हे सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांना माहित आहे की, जेव्हा ते आपली सर्वोत्तम कामगिरी करत नाहीत, तेव्हा त्यांच्यावर दडपण येतं. हे समजण्यासारखे आहे. परंतु त्यांच्यापैकी बरेच खेळाडू जगभरात जाऊन टी20 क्रिकेट खेळले आहेत. आता हे त्यांच्यावर अवलंबून आहे की ते त्यांचा खेळ कसा पुढे नेतात.”
कर्स्टन पुढे बोलताना म्हणाले की, “माझा फलंदाजांना सल्ला होता की चौकार-षटकार मारा आणि हलक्या चेंडूंचा फायदा घ्या.” कर्स्टन यांना विश्वास आहे की त्यांच्या फलंदाजांनी 15 षटकांपर्यंत चांगली कामगिरी केली. मात्र एकदा विकेट पडायल्या लागल्या की त्यांनी स्ट्राइक रोटेट करणं थांबवलं आणि ते कठीण स्थितीत सापडले.
कर्स्टन म्हणाले, “आम्ही 15 षटकांपर्यंत शानदार खेळलो. आम्ही धावगती राखून खेळत होतो. मात्र आम्ही विकेट गमावल्या आणि मग आम्ही स्ट्राईक रोटेट करणं थांबवलं. यानंतर आम्ही चौकार-षटकारांच्या मागे लागलो. एकदा का तुम्ही या टप्प्यावर पोहोचलात की नेहमीच कठीण होतं. म्हणून आम्ही 15 षटकापर्यंंत जे केलं, तेच करणं गरजेचं होतं.”
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग यांना नामांकन, कोणाला मिळालं पदक?
पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल
टीम इंडियाच्या पाकिस्तावरील थरारक विजयाचे 3 हिरो, एका खेळाडूचं नाव कोणाच्याच तोंडी नाही