इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स येथे सुरू असलेला पहिला कसोटी सामना रोमांचक स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडला विजयासाठी ६१ धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडकडून जो रूट (७७ धावा) आणि बेन फोक्स (०९ धावा) फलंदाजी करत आहेत. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा फलंदाज कॉलिन डी ग्रँडहोम याने पहिल्याच चेंडूवर आपली विकेट गमावत लॉर्ड्सवरील ४३ वर्षे जुन्या नकोशा घटनेची पुनरावृत्ती केली आहे.
कॉलिन (Colin De Grandhomme) ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर (Lords Stadium) पहिल्या चेंडूवर एकही धाव न करता धावबाद होणारा जगातील दुसराच फलंदाज (Runout On Golden Duck In Lords) ठरला आहे.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावादरम्यान हा किस्सा घडला. टॉम ब्लंडल आणि डॅरिल मिचेल यांच्या अभेद्य भागीदारीला मोडण्याचे काम केले इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने. ब्रॉडने बेन फोक्सच्या हातून मिचेलला झेलबाद केले. त्यानंतर कॉलिन फलंदाजीसाठी आला होता. मात्र पहिलाच चेंडू खेळल्या एक धाव घेण्याच्या प्रयत्नात ओली पॉपने त्याला धावबाद केले. यासह तब्बल ४३ वर्षांनंतर लॉर्ड्सवर कसोटी सामना खेळताना गोल्डन डकवर धावबाद होण्याचा नकोसा विक्रम त्याने नावावर केला आहे.
लॉर्ड्सवर गोल्डन डकवर धावबाद होणारा पहिला खेळाडू
यापूर्वी लॉर्ड्सच्या मैदानावर गोल्डन डकवर धावबाद होणारे पहिले खेळाडू भारताचे माजी कर्णधार एस वेंकटराघवन हे होते. ४३ वर्षांपूर्वी म्हणजेच, १९७९ साली लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यात वेंकटराघवन पहिल्या चेंडूचा सामना केल्यानंतर धावबाद झाले होते. त्यानंतर गेल्या ४३ वर्षात लॉर्ड्सवर असे झाले नव्हते.
कसे राहिले कॉलिन डी ग्रँडहोमचे सामन्यातील प्रदर्शन
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात शून्यावर आपली विकेट गमावणाऱ्या कॉलिनने पहिल्या डावात नाबाद ४२ धावांची खेळी केली होती. ५० चेंडू खेळताना ४ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद ४२ धावा केल्या होत्या. तो न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा फलंदाज राहिला होता. त्याला वगळता इतर फलंदाज ३० धावांपर्यंतही मजल मारू शकले नव्हते.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कुणाला ऑटोग्राफ दिले, कुणाशी गप्पा मारल्या, तर कुणाला पॅड्स भेट दिले; नील वॅगनरचं होतंय कौतुक
एकाचं पोट दुखलं, दुसऱ्याची गोलंदाजी नडली; क्रिकेट इतिहासातील एकमेव षटक, ज्यात तिघांनी केली गोलंदाजी
पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर, कर्णधार अन् मुख्य निवडकर्त्यामध्येच ‘या’ खेळाडूवरून खडाजंगी