---Advertisement---

या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांना टी२०मध्ये दिलाय त्रास

On: शुक्रवार, जानेवारी 31, 2020 3:56 PM
---Advertisement---

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(31 जानेवारी) स्काय स्टेडियम येथे चौथा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 165 धावा केल्या आहेत आणि न्यूझीलंडला विजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज कॉलिन मुन्रोने अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच त्याने भारताविरुद्ध एक खास विक्रम केला आहे. 

त्याने 47 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 64 धावांची खेळी केली. त्यामुळे तो आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने हा पराक्रम करताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचला मागे टाकले आहे.

मुन्रोचे आता भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 11 सामन्यात 41.10 च्या सरासरीने 411 धावा झाल्या आहेत. यात त्याच्या 1 शतकाचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच भारताविरुद्ध फिंचने 13 टी20 सामन्यात 405 धावा केल्या आहेत.

आज मुन्रोला शार्दुल ठाकूर आणि विराट कोहलीने मिळून धावबाद केले.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

411 धावा – कॉलिन मुन्रो

405 धावा – ऍरॉन फिंच

353 धावा – ग्लेन मॅक्सवेल

325 धावा – केन विलियम्सन

322 धावा – एव्हिन लुईस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---