भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आता दुलीप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy) खेळताना दिसणार आहे. तो अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील टीम बी चा भाग आहे. या संघात पंतसोबत यशस्वी जयस्वाल खेळणार आहे. तत्पूर्वी पंत त्याच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्याच्या कामगिरीमुळेही चर्चेत असतो. पंतनं अलीकडेच एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मदत केली. यासाठी त्याचे खूप कौतुक होत आहे. पंतनं विद्यार्थ्याची कॉलेजची फी भरल्याचा दावा केला जात आहे.
कार्तिकेय नावाच्या विद्यार्थ्याने एका वेबसाइटवर त्याची अडचण सांगितली आहे. कॉलेजची फी भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याचे त्याने सांगितले. एक्सवरील हँडलद्वारे कार्तिकेयची अडचण देखील सांगण्यात आली. पंतला टॅग करण्यात आले. ही पोस्ट पाहताच पंतनं यावर प्रतिक्रिया दिली. पंतनं लिहिलं, “तुमची स्वप्ने पूर्ण करा. देवाकडे नेहमीच चांगली योजना असते.”
Keep chasing your dreams 👌👌 . God has better plans always tc
— Rishabh Pant (@RishabhPant17) August 26, 2024
पंतनं महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी पैसे दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पंतच्या उत्तरानंतर एक्स युजर जनील मोरडिया यांनी लिहिलं की, “त्याने एका सेमिस्टरच्या फी साठी 90,000 रुपये दिले आहेत.” पण उरलेल्या 7चे काय?”
पंतचं वय सध्या 26 वर्ष 328 दिवस आहे. पंतच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 33 कसोटी, 31 एकदिवसीय आणि 76 टी20 सामने खेळले आहेत. 33 कसोटी सामन्यात त्यानं 43.67च्या सरासरीनं 2,271 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्यानं 11 अर्धशतक आणि 5 शतक झळकावले आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 159 आहे.
31 एकदिवसीय सामन्यात त्यानं 33.50च्या सरासरीनं आणि 106.21च्या स्ट्राईक रेटनं 871 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 5 अर्धशतकांसह 1 शतक देखील झळकावलं आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 125 आहे. 76 टी20 सामन्यात त्यानं 23.25च्या सरासरीनं 1,209 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 127.26 राहिला आहे. टी20 मध्ये त्यानं आतापर्यंत 3 अर्धशतकं झळकावली आहेत, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 65 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! 137 चेंडू खेळूनही उघडले नाही खाते, इंग्लंडच्या फलंदाजाची खेळी ठरली चर्चेचा विषय
घटस्फोटानंतर नताशाने सांगितला प्रेमाचा अर्थ; म्हणाली, “प्रेम कधी अपमान करत…”
DPL 2024; गौतम गंभीरच्या शिष्याचा रुद्रावतार! रिषभ पंतच्या संघाला लोळावले