---Advertisement---

आयपीएल 2025 मेगा लिलावात मिचेल स्टार्कला मोठ्या किंमतीत विकत घेऊ शकतात ‘या’ 3 फ्रँचायझी!

On: मंगळवार, ऑगस्ट 27, 2024 6:44 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 साठी झालेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव करण्यात आला होता. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला विकत घेण्यासाठी 24 कोटी 75 लाख रुपये खर्च केले होते. यासह तो आयपीएल इतिहासात विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. गेल्या मोसमात, या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने प्लेऑफ सामन्यांमध्ये शानदार गोलंदाजी केली होती आणि केकेआरला तिसरे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिकाही बजावली होती.

असे असूनही, केकेआर फ्रँचायझी आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी एवढ्या महागड्या खेळाडूला कायम ठेवण्याची चूक करणार नाही. केकेआर मेगा लिलावापूर्वी स्टार्कला रिलीज करू शकते, जेणेकरून त्यांची पर्समनी वाढू शकते. अशा स्थितीत इतर अनेक फ्रँचायझींनाही मेगा लिलावात मिचेल स्टार्कवर बोली लावण्याची मोठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या लेखात, आम्ही अशा 3 फ्रँचायझींचा उल्लेख करणार आहोत, ज्या आयपीएल 2025 मेगा लिलावामध्ये मिचेल स्टार्कला लक्ष्य करू शकतात.

आयपीएल 2025 च्या लिलावात मिचेल स्टार्कला रिलीझ केल्यास 3 फ्रँचायझी मोठी बोली लावू शकतात

3. मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील संयुक्त सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. मात्र, मुंबई संघाला आयपीएल 2024 मध्ये एका वेगवान गोलंदाजाची उणीव भासत होती. जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा हे दोन प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या भूमिकेत दिसले. मात्र त्यांच्याव्यतिरिक्त संघाकडे फारसे पर्याय नव्हते. अशा परिस्थितीत जर फ्रँचायझीला लिलावात स्टार्कला विकत घेण्याची संधी मिळाली तर ते मागे हटणार नाहीत. कारण मुंबई फ्रँचायझी लिलावात पैसे खर्च करण्यात कंजूषपणा दाखवत नाही, याचा प्रत्यत आयपीएलप्रेमींना यापूर्वीच्या लिलावात आला आहे.

2. कोलकाता नाईट रायडर्स
मिशेल स्टार्कला रिलीज केल्यानंतर मेगा लिलावात त्याला पुन्हा विकत घेण्याचा केकेआर प्रयत्न करेल. मेगा लिलावात खेळाडूंवर फार मोठ्या बोली लागत नाहीत, त्यामुळे केकेआर स्टार्कला गेल्या वर्षीच्या तुलनेत आगामी लिलावात स्वस्तात खरेदी करू शकते. केकेआरला स्टार्कच्या गोलंदाजीची चांगली परख आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा स्टार्कवर बोली लावताना दिसू शकतात.

1. गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्स संघाचा गोलंदाजी विभाग खूपच कमकुवत आहे. संघ मोठी धावसंख्या उभारण्यात सक्षम असूनही त्यांच्या गोलंदाजांना लक्ष्याचा बचाव करता येत नाही. गुजरात टायटन्सने आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात स्टार्कला विकत घेण्यासाठी शेवटपर्यंत बोली लावली होती, परंतु केकेआरने 25 लाखांची बोली वाढवली आणि डावखुरा वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश केला. यावेळी लिलावात स्टार्कला कोणत्याही किंमतीत विकत घेण्यासाठी गुजरातचा संघ प्रयत्नशील असेल.

हेही वाचा-

अविश्वसनीय! 137 चेंडू खेळूनही उघडले नाही खाते, इंग्लंडच्या फलंदाजाची खेळी ठरली चर्चेचा विषय

घटस्फोटानंतर नताशाने सांगितला प्रेमाचा अर्थ; म्हणाली, “प्रेम कधी अपमान करत…”

Duleep Trophy 2024: रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज स्पर्धेतून बाहेर; मोठे कारण समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---