कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज खूप संथ क्रिकेट खेळत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. क्रिकेटच्या या प्रकारात फलंदाजांचा स्ट्राईक रेटही तितका जास्त नसते. आता इंग्लंडच्या एका खेळाडूने सर्वात संथ खेळी खेळल्याचे प्रकरण समोर आले आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अशा संथ खेळीची कोणालाच अपेक्षा नव्हती.
इंग्लंडच्या डर्बीशायर क्रिकेट लीगमध्ये डार्ले ॲबे क्रिकेट आणि मिकेलओव्हर यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. या सामन्यात तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना मिकेलओव्हर संघाने 35 षटकात 271 धावा केल्या होत्या. मिकेलओव्हरसाठी सलामीवीर मॅक्स थॉम्पसनने 128 चेंडूंचा सामना करत 186 धावांची खेळी खेळली. यानंतर डार्ले ॲबे क्रिकेट संघाने 45 षटकात केवळ 21 धावा केल्या होत्या आणि 4 गडी गमावले होते. या 45 धावांपैकी 9 धावा अतिरिक्त होत्या.
या सामन्यात डार्ले ॲबे क्रिकेट संघातील पिता-पुत्र जोडीने टूकटूक क्रिकेट खेळून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. वडील इयान बेस्टविक आणि मुलगा थॉमस बेस्टविक यांनी त्यांच्या संथ फलंदाजीने गोलंदाजांनाही थकवले. इयान बेस्टविक 137 चेंडूंचा सामना करूनही आपले खाते उघडू शकले नाही. तर थॉमस बेस्टविकने 71 चेंडूंचा सामना करताना केवळ 4 धावा केल्या होत्या.
या सामन्यातील संथ खेळीमुळे या पिता-पुत्राच्या जोडीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सामन्यानंतर 48 वर्षीय इयान बेस्टविक यांनी सांगितले की, “आमच्या संघाचा अनुभव कमी होता आणि त्याची धावसंख्या खूप जास्त झाली होती. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी खेळत नव्हतो. जर आम्ही सामना जिंकण्यासाठी खेळलो असतो तर आमचा संघ हरला असता. त्यामुळे आम्ही दिवसभर खेळण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमच्या विकेट्स वाचवल्या. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला आणि आम्हाला पराभव पत्करावा लागला नाही.” असे असले तरी या जोडीच्या फलंदाजीची चर्चा आता सगळीकडे होत आहे.
हेही वाचा-
घटस्फोटानंतर नताशाने सांगितला प्रेमाचा अर्थ; म्हणाली, “प्रेम कधी अपमान करत…”
Duleep Trophy 2024: रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज स्पर्धेतून बाहेर; मोठे कारण समोर
गांगुली-धोनी नाही तर, हे दोन दिग्गज आवडीचे कर्णधार; स्टार क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य