भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. गेल्या महिन्यातच दोघांचे चार वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले. हार्दिकला खूप ग्लॅमरस लाइफ आवडते आणि नताशाला ही शानशौकत, दिखाऊपणा आवडला नाही. त्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढत गेले आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. नताशा सध्या तिचा मुलगा अगस्त्यासोबत सर्बियामध्ये आहे आणि सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. हार्दिकची माजी पत्नी अनेकदा आपल्या पोस्टद्वारे चाहत्यांना बुचकळ्यात पाडत असते. आताही असेच काही पाहायला मिळाले आहे.
नताशा स्टॅनकोविचने ‘मन की बात’ लिहिली
नताशा स्टॅनकोविचने नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. ही स्टोरी सध्या चाहत्यांमध्ये चांगलीच व्हायरल होत आहे. तिने या स्टोरीमध्ये लिहिले आहे की, ‘प्रेम शांती असते, प्रेम दयाळू असते. ते मत्सर करत नाही, अभिमान बाळगत नाही, इतरांचा अनादर करत नाही. तो आत्मा शोधत नाही, प्रेम आत्मा शोधत नाही, तो सहजासहजी संतप्त होत नाही. प्रेम चुकीच्या गोष्टीची नोंद ठेवत नाही, परंतु सत्यात आनंदित होते. हे नेहमीच संरक्षण करते, नेहमी विश्वास ठेवते, नेहमी आशा ठेवते, नेहमीच टिकते, प्रेम कधीही अपयशी ठरत नाही…’, नताशाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. चाहते नताशाची ही स्टोरी हार्दिकसोबत जोडत आहेत.
दोघेही एकमेकांपासून वेगळे का झाले?
हार्दिक पांड्याने जुलै महिन्यात पत्नी नताशा स्टॅनकोविक हिला घटस्फोट दिला. हार्दिक आणि नताशा यांनी घटस्फोटाची पुष्टी केली तेव्हा दोघांनीही त्यांच्या विभक्त होण्यामागचे कारण सार्वजनिक केले नव्हते. अलीकडेच बातम्या समोर आल्या आहेत की नताशा हार्दिकच्या व्यक्तिमत्त्वाशी ताळमेळ राखू शकत नव्हती, कारण हार्दिक स्वतःमध्ये खूप मग्न होता. नताशाने नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि गोष्टी हाताळण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती अपयशी ठरली. त्यामुळेच तिने माघार घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, हार्दिक पांड्या सध्या सुट्टीवर आहे. तो सध्या परदेश दौऱ्यावर आहे. पण तो कोणासोबत फिरतोय हे सांगणे कठीण आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो ट्रेनमध्ये बसलेला दिसत आहे. सध्या त्याचे नाव ब्रिटीश गायिका जास्मिन वालियासोबत जोडले जात आहे.
हेही वाचा-
“पराभवासाठी प्रशिक्षक आणि कर्णधार जबाबदार”, पीसीबी अध्यक्षांचा मोठा आरोप
Duleep Trophy 2024: रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज स्पर्धेतून बाहेर; मोठे कारण समोर
गांगुली-धोनी नाही तर, हे दोन दिग्गज आवडीचे कर्णधार; स्टार क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य