भारताने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा उपकर्णधार अक्षर पटेलची क्षेत्ररक्षणात जबरदस्त कामगिरी दिसली. त्यामुळे तो लाँग-ऑफवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असता त्याला टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली.
इंग्लंडविरुद्ध अक्षरने सामन्याच्या निकाल पालटण्यासाठी उत्तम क्षेत्ररक्षण केले. त्याचे हे क्षेत्ररक्षण पाहून क्रिकेट चाहत्यांना नक्कीच कपिल देव यांनी १९८३च्या विश्वचषकात आणि सूर्यकुमार यादवने २०२४च्या टी२० विश्वचषकात घेतलेल्या झेलची आठवण आली असेल.
या स्पर्धेत भारताच्या क्षेत्ररक्षणाबाबत अनेक चर्चा सुरू आहे. संघाने उपांत्य फेरीच्या आधी १३ झेल सोडले होते, मात्र इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अक्षरने कमालीचे क्षेत्ररक्षण केले. त्याने पहिले हॅरी ब्रूकचा अप्रतिम झेल घेतला आणि नंतर विल जॅक्सच्या झेलवेळी सीमारेषेजवळ नियंत्रण राखत शिवम दुबेकडे चेंडू फेकला. शिवमने तो झेल घेतला. अक्षरने फिल सॉल्टचाही झेल घेतला होता. यावरून तो म्हणाला, “माझ्यामते चेंडू माझा पाठलाग करत होता.”
अक्षर या स्पर्धेत कमी सामने खेळला. त्याला बाकीच्या भारतीय खेळाडूंसारखी वाहवा मिळाली नाही, मात्र त्याने उत्तम कामगिरी करत अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचे २०२५च्या एशिया कपवेळी उपकर्णधारपद शुबमन गिलकडे गेले होते. तसेच या स्पर्धेत नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दोन सामन्यात तो बाकावर होता. भारताचा आता तेथे अंतिम सामना खेळणार असून संघाच्या प्लेइंग इलेवनमध्ये त्याची जागा निश्चित आहे. भारताने येथे या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅंड्सविरुद्ध सामने खेळले होते.
या स्पर्धेत अक्षरने सहा सामन्यात खेळताना ८ विकेट्स घेतल्या आहेत. तेव्हा त्याचा इकॉनॉमी रेट ८.०९ राहिला जो जसप्रीत बुमरहानंतर (६.६२) उत्तम आहे. तो २०२३च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला मुकला होता. आता रविवारी (८ मार्च) घरच्या मैदानावर खेळण्यास तो आतुर आहे. याबाबत तो म्हणाला, “घरच्या मैदानावर खेळण्याची मी खूप प्रतिक्षा केली आहे आणि आता तो क्षण आला. त्यामुळेच मी त्या दोन सामन्यात खेळलो नाही. आता दोन वर्षांनंतर मी घरच्या मैदानावर खेळणार असून ते पण आयसीसी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात. माझ्यासाठी हा क्षण गर्वाचा आहे.”
सोशल मीडियावर अहमदाबादच्या या मैदानाला अनलकी म्हटले जाते. त्यावरून अक्षर म्हणाला, “मी त्या सामन्यात (२०२३ विश्वचषक अंतिम सामना) खेळलो नाही, आता ते (jinx) तुटण्याची शक्यता आहे.”
या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड अंतिम सामन्यात समोरा-समोर येणार आहेत. हा सामना रविवारी (८ मार्च) खेळला जाणार आहे.






