---Advertisement---

संजू सॅमसनच्या जागी खेळणार वैभव सूर्यवंशी? माजी खेळाडूने केले मोठे वक्तव्य

On: गुरूवार, जुलै 2, 2026 10:01 PM
---Advertisement---

भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये २ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता भारतीय संघ ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानात उतरला आहे. या दोन्ही मालिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळणार का? आयर्लंडविरूद्ध झालेल्या २ सामन्यांमध्ये आणि इंग्लंडविरूद्धच्या १ टी-२० सामन्यात वैभवला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. आता संजू सॅमसनच्या जागी त्याला संधी देण्यची मागणी जोर धरु लागली आहे. यावर माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

वैभव सूर्यवंशीला आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. वैभव भारतीय संघात स्थान मिळवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. पण ३ सामने होऊन गेले, त्याला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. वैभव सलामीला फलंदाजी करणारा फलंदाज आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन या ३ फलंदाजांना संधी दिली आहे.

संजू सॅमसनने टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. पण आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात तो फ्लॉप ठरला आहे. वैभव सूर्यवंशीला संजू सॅमसनच्या जागी संधी मिळायला हवी का? या प्रश्नाचं उत्तर देताना सबा करीम म्हणाले, “मला असं मुळीच वाटत नाही. सॅमसन एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. तो मॅचविनर खेळाडू आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. त्याआधी झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत त्याने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. मग आता संजू सॅमसनवर टीका का केली जात आहे.”

तसेच वैभव सूर्यवंशीबाबत बोलताना ते म्हणाले की, “पदार्पण न करता भारतीय संघासोबत राहण्याचाही त्याला फायदा होऊ शकतो. त्याला खूप काही शिकायला मिळेल. भारतीय संघात स्थान मिळवायचं असेल, तर त्याला स्वत:ला सातत्याने सिद्ध करावं लागेल. त्याच्याकडे टॅलेंट आहे, पण अशा स्पर्धात्मक वातावरणात योग्य वेळेची वाट पाहणंही तितकंच महत्वाचं आहे. यामुळे तो खेळाडू आणि माणूस म्हणून आणखी घडेल.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---