---Advertisement---

फुटबॉल फिव्हर: मेस्सीची जर्सी घालून स्टेडियममध्ये पोहोचला यशस्वी जयस्वाल! शेअर केला खास व्हिडिओ

On: गुरूवार, जुलै 2, 2026 9:46 PM
---Advertisement---

सध्या संपूर्ण जगावर फीफा वर्ल्ड कप 2026 (Fifa world Cup 2026) स्पर्धेचा फिव्हर चढला आहे. स्पर्धेचा नॉकआउट टप्पा सुरू झाला असून ब्राझील, मेक्सिको यांसारख्या बलाढ्य संघांनी पुढच्या फेरीत धडक मारली आहे. याच दरम्यान भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालचा (Yashasvi Jaiswal) एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात तो अर्जेंटिनाची जर्सी परिधान केलेला दिसत आहे.

यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal fan of Lionel Messi) लिओनेल मेस्सीची 10 नंबरची जर्सी घातली आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे, तो अर्जेंटिनाचा सामना पाहायला गेलेला नव्हता, तर तो 30 जून रोजी झालेल्या फ्रान्स विरुद्ध स्वीडन या सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता. या सामन्यात फ्रान्सने स्वीडनचा 3-0 असा पराभव करत ‘राउंड ऑफ 16’ मध्ये प्रवेश केला.

जयस्वालने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या सामन्याचा एक व्हिडिओ क्लिप शेअर केला आहे. त्यासोबत त्याने “बकेट लिस्ट” असे कॅप्शन दिले आहे, ज्याचा अर्थ फिफा वर्ल्ड कपचा सामना थेट स्टेडियममध्ये पाहणे हे त्याचे स्वप्न होते, जे आज पूर्ण झाले. जयस्वाल जरी फ्रान्स आणि स्वीडनचा सामना पाहायला गेला असला, तरी त्याने घातलेल्या जर्सीवरून हे स्पष्ट होते की तो लिओनेल मेस्सीचा मोठा चाहता आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, किलियन एम्बापेने दोन गोल केले. या दोन गोलसह तो वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एम्बापेच्या नावावर आता 18 गोल आहेत, तर लिओनेल मेस्सी 19 गोलसह पहिल्या स्थानावर आहे. तसेच, 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये एम्बापेने आतापर्यंत 6 गोल केले असून, तो मेस्सीसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.

यशस्वी जयस्वालच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, तो सध्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर आहे आणि त्याला वनडे संघातही स्थान मिळालेले नाही. शेवटच्या वेळी त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात खेळताना पाहिले होते, जिथे त्याने संधीचे सोने करत नाबाद 110 धावांची खेळी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---