दुलीप ट्रॉफी 2024 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत माहिती दिली आहे. निवड समितीने 2024-25 दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी संघात काही बदलांची घोषणा केली आहे. भारत संघ ‘ब’ मध्ये वेगवान गोलंदाज नवदीप सैनी मोहम्मद सिराजची जागा घेईल. तर भारत ‘क’ संघात उमरान मलिकच्या जागी गौरव यादव खेळणार आहे.
मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक दोघेही आजाराने त्रस्त असल्याने ते दुलीप ट्रॉफी सामन्यांसाठी वेळेत तंदुरुस्त होण्याची अपेक्षा नाही. त्यामुळे दोघेही स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजालाही भारत ‘ब’ संघातून वगळण्यात आले आहे. पण जडेजा कोणत्या कारणाने पडला याबाबत अद्याप खुलासा झाले नाही.
दुलीप ट्राॅफी स्पर्धा 5 सप्टेंबर 2024 पासून अनंतपूर, आंध्र प्रदेश आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे सुरू होणार आहे.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी चार संघांचे सुधारित संघ पुढीलप्रमाणे
भारत अ: शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएल राहुल, टिळक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा , कुमार कुशाग्र, शास्वत रावत
भारत ब: अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी*, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी , एन जगदीसन (यष्टीरक्षक)
भारत क: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीथ, हृतिक शोकीन, मानव सुथार, गौरव यादव, वैज्ञानिक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयांक मार्केंडे, मयंकन (यष्टीरक्षक), संदीप वाॅरियर
भारत ड: श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टीरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (यष्टीरक्षक), सौरभ कुमार
हेही वाचा-
ब्रेकिंग बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, या 15 खेळाडूंना संघात स्थान
गांगुली-धोनी नाही तर, हे दोन दिग्गज आवडीचे कर्णधार; स्टार क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
भारतीय सलामीवीर नव्या संघात दाखल; पुन्हा एकदा या स्पेशल लीगमध्ये दाखवणार आपली जादू