भारताचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने आपल्या आवडत्या कर्णधाराबद्दल खुलासा केला आहे. त्याने टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माला आपला आवडता कर्णधार असे वर्णन केले आहे. रिंकू सिंगनेही विराट कोहलीच्या नेतृत्वाचे कौतुक केले. रिंकू सिंग विराटच्या नेतृत्वाखाली खेळला नसला तरी त्याने विराटला आरसीबी आणि टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवताना पाहिले आहे. पण रिंकू सिंगने आपल्या आवडत्या कर्णधारांपैकी एमएस धोनीची निवड केली नाही. जो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक आयसीसी ट्रॉफी जिंकवणारा भारताचा एकमेव कर्णधार आहे.
डावखुरा फलंदाज रिंकू सिंग आतापर्यंत रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे, पण त्याचे आवडते कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आहेत. रिंकू सिंगने न्यूज 24 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला कर्णधारपदातील रोहित शर्मा भैय्या आणि विराट भैय्या आवडतात. कारण कर्णधारपदात आक्रमकता खूप महत्त्वाची असते. संघाला सोबत घेऊन जाणे, त्यामुळे त्यांचे कर्णधारपदही खूप चांगले आहे.
डावखुऱ्या रिंकूने आपल्या आवडत्या फलंदाजांचा उल्लेख करताना सांगितले की, त्याला रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना आणि सूर्यकुमार यादव यांची फलंदाजी पहायला त्याला आवडते.
23 टी-20 आणि 2 एकदिवसीय सामने खेळलेला रिंकू सिंग म्हणाला, “त्याला सुरेश रैनाची फलंदाजी आवडते. पणा त्याचा सर्वात आवडता फलंदाज रोहित शर्मा आहे. त्याच्याकडे खेळण्यासाठी खूप वेळ आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे देखील त्याचे आवडते फलंदाज आहेत. आवडत्या गोलंदाजाबाबत रिंकू सिंगने सांगितले की, आमच्याबद्दलच काय, सर्वांचा आवडता गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. रिंकू जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. जसप्रीत बुमराहला गोलंदाजीत कर्णधार म्हटले जाते, कारण तो गोलंदाजीत संघाचे नेतृत्व करतो.
हेही वाचा-
भारतीय सलामीवीर नव्या संघात दाखल; पुन्हा एकदा या स्पेशल लीगमध्ये दाखवणार आपली जादू
जय शहा आयसीसी अध्यक्ष झाले तर कोणाला जास्त फायदा होईल? सुनील गावस्कर स्पष्टच म्हणाले…
जय शहांची मोठी घोषणा! देशांतर्गत स्पर्धेतील खेळाडूही होणार मालामाल