---Advertisement---

डेथ-ओव्हर्स स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह! आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये बसला केवळ एकच षटकार अन् इकॉनॉमी रेट…

On: शनिवार, मार्च 7, 2026 3:27 PM
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अनेकदा त्याच्या विलक्षण कामगिरीने चर्चेत असतो. नुकतेच त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ज्याप्रकारे गोलंदाजी केली ते पाहून पुन्हा एकदा क्रिकेट चाहते त्याची वाहवा करत आहे. या सामन्यात त्याने २ षटके शेवटच्या टप्प्यात टाकली आणि त्याला डेथ-ओव्हर स्पेशालिस्ट का म्हणतात, हे पुन्हा त्याने सिद्ध केले.

शेवटच्या टप्प्यात जेवढे बुमराहचे षटक शिल्लक राहतात तेवढा अधिक त्रास विरोधी संघांना होतो. त्याच्या टी२० विश्वचषक २०२४पासूनच्या आकडेवारीवर एकदा नजर टाकली तर लक्ष्याचा बचाव करताना त्याच्या शेवटी टाकलेल्या षटकांमध्ये केवळ एकच षटकार बसला असून त्याची इकॉनॉमी ५ पेक्षा कमी राहिली आहे.

बुमराहने टी२० विश्वचषक २०२४ पासून ते टी२० विश्वचषक २०२६च्या उपांत्य फेरीपर्यंत ९ सामन्यांत लक्ष्याचा बचाव करताना डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने १४ षटके टाकली असून त्यात केवळ एका चेंडूवर षटकार बसला आहे. तसेच त्याने यामध्ये ९ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने ही कामगिरी केवळ छोट्या संघांविरुद्धच नाहीतर पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध केली आहे.

बुमराहने डेथ ओव्हर्समध्ये लक्ष्याचा बचाव करताना ८२ चेंडू टाकले. त्यामध्ये विरोधी संघांनी ६० धावा केल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट ४.३९ राहिला. डेथ ओव्हर्स म्हटले की विरोधी संघ धावांची बरसात करतो, मात्र बुमराहविरुद्ध हे समीकरण जरा वेगळेच आहे.

नुकतेच त्याने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात १६व्या षटकात ८ धावा आणि १८व्या षटकात ६ धावा दिल्या होत्या. या सामन्यात त्याने कर्णधार हॅरी ब्रूकची विकेट घेतली आणि ती त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५००वी विकेट ठरली.

भारताला पुन्हा एकदा टी२० विश्वविजेते बनण्याची संधी आहे. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत एकही संघ सलग विजेतेपद जिंकला नाही. दुसरीकडे न्यूझीलंड दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०२२मध्ये ते अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---