वेस्ट इंडीजचे माजी अष्टपैलू कोली स्मिथ यांचे ९ सप्टेंबर १९५९ रोजी इंग्लंडमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले होते. या घटनेनंतर गॅरी सोबर्स यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला होता. सोबर्स व स्मिथ यांच्यात घट्ट मैत्री होती.
एक शोकांतिका
या घटनेबद्दल सर गॅरी सोबर्स (Garry Sobers) यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले, “त्या दिवशी आम्ही चार जण बाहेर निघालो होतो, परंतु रॉय गिलख्रिस्ट आला नाही. रॉयची एक तास प्रतीक्षा केल्यानंतर, आम्ही तिघांनीच जाण्याचा निर्णय घेतला. जर गिलख्रिस्ट वेळेवर आला असता किंवा आम्ही थोडी अजून जास्त वाट पाहिली असती तर कदाचित ही शोकांतिका घडली नसती.”
त्या वेळी, सोबर्स लँकशायर लीगमध्ये रॅडक्लिफ संघाकडून खेळत होते. कोली स्मिथ (Collie Smith) यांचा नुकताच बर्नली संघासोबतचा करार संपला होता होता. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी लोअरहाऊसविरुद्ध बर्नलीसाठी त्रिशतक ठोकले होते. मध्यमगती वेगवान गोलंदाज टॉम ड्युडनी दारवेनसाठी खेळत. तिघांची भेट मॅन्चेस्टर येथे, एका चाहत्याच्या घरी झाली. गिलख्रिस्टची वाट पाहत त्यांनी रात्रीचे जेवण केले. त्यानंतर थोडावेळ गप्पा मारत त्यांनी वेळ घालवला. तिन्ही क्रिकेटपटू दुसऱ्या दिवशी सकाळी एक मैत्रीपूर्ण सामना खेळणार होते. त्यासाठी ते लंडनला जाण्यास निघाले. उशीरा झाल्यामुळे त्यांनी लंडनला जाणारा रहदारीचा मार्ग न निवडता एका वेगळ्या मार्गाने जाण्याचे ठरवले.
स्मिथ यांनी सोबर्स यांच्या फोर्ड परफेक्टचे स्टेअरिंग हातात घेतले. थोड्या वेळाने त्यांनी ते ड्युडनी यांकडे दिले. ड्युडनी यांनी जवळपास अर्धी रात्र गाडी चालवल्याने पहाटेच्या वेळी सोबर्स यांची गाडी चालवण्याची बारी आली. डयुडनी पॅसेंजर सीटवर बसले आणि स्मिथ मागच्या सिटवर झोपले.
स्ट्रॉफोर्डशायरमधील स्टोन ए ३४ च्या रस्त्यावरून कार वेगात जात होती. पहाटे ४.४५ वाजता ते डार्लस्टन बेंडजवळ गेले असता, एक गाडी खुप वेगाने आली. तिची हेडलाईट सोबर्स त्यांच्या डोळ्यांवर चमकली. सोबर्स यांना काहीच प्रतिक्रिया देता आली नाही. त्यांच्या डोळ्यासमोर अचानक अंधार झाला.
ते १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकले होते. सोबर्स थोड्या वेळाने शुद्धीवर आले, ड्युडनी मोठ्यामोठ्याने विव्हळत होते तर स्मिथ एका बाजूला जमिनीवर पडलेले. “तू कसा आहेस लिटल मॅन ?” असे सोबर्स यांनी स्मिथ त्यांना विचारले. स्मिथ यांनी ताबडतोब उत्तर दिले, “मी ठीक आहे, मित्रा, ड्युडनीला बघ.”
इतक्यात एक रुग्णवाहिका आली आणि तिघांना रुग्णालयात घेऊन गेली. चेहऱ्यावर काही घाव आणि पडलेल्या दातामुळे ड्युडणी काही तास बेशुद्ध राहिले. सोबर्स यांच्या मनगटाचे हाड तुटलेले, एक डोळ्यांवर थोडी जखम होती आणि बोटांच्यामध्ये देखील जरा फाटले होते. ड्युडनी व सोबर्स यांच्यापेक्षा स्मिथ यांना सर्वात जास्त इजा झाली होती. त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर नुकसान झाले होते.
अपघाताच्या तीन दिवसांनंतर, एक उपदेशक रुग्णालयात गेला. सोबर्स आणि ड्युडनी जेथे होते त्या खोलीत जाऊन त्याने प्रारब्ध,जीवन,अनिश्चितता आणि शोकांतिकेविषयी बोलणे सुरू केले. शेवटी त्याने कोली स्मिथ गेल्याची बातमी त्यांना सांगितली.
क्रिकेटविश्वाला धक्का बसला. ओ’निल गॉर्डन ‘कोली’ स्मिथ हा जमैकामधील प्रसिद्ध खेळाडू होता. २६ व्या वर्षी तो अस्सल अष्टपैलू खेळाडूंसारखा परिपक्व झाला होता. सोबर्स यांच्यासोबत मिळून स्मिथने वेस्ट इंडीज संघाला अष्टपैलू खेळाडूंचा गड बनवायचा सुरुवात केली होती.
जमैकाच्या आवडत्या खेळाडूच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्यासाठी किंग्स्टन येथे झालेल्या अंत्यसंस्कारात ६०,००० शोकाकुल चाहते सहभागी झाले होते.
स्मिथ यांच्या अंतिम आकडेवारीनुसार त्यांनी, २६ कसोटी सामन्यात ३१.७० च्या सरासरीने १३३१ धावा आणि ४८ गडी बाद केले होते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने रे लिंडवॉल, कीथ मिलर आणि रिची बेनॉविरुद्ध १०४ तर फ्रेड ट्रूमन, ब्रायन स्टॅथम, जिम लेकर आणि टोनी लॉकविरुद्ध १६१ धावा फटकावल्या होत्या. १९५८ मध्ये त्यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले होते.
लोकांना विश्वास होता की, वेळेसोबत त्यांच्यात सुधारणेला वाव होता. काळाने त्यांना खूप लवकर नेले. त्यांच्या अफाट प्रतिभेची किमया आपण अजून एक दशक तरी पाहू शकलो असतो. स्मिथ यांनी त्यांच्या प्रचंड सामर्थ्याची केवळ झलक दाखविली होती.
इंग्लंड आणि पाकिस्तान दौर्यावर सोबर्स यांचे स्मिथ रूममेट होते. स्मिथ यांच्या निधनानंतर आठवणींनी सोबर्स खूप शोकग्रस्त झाले होते. कारण, त्या अपघातावेळी सोबर्स गाडी चालवत होते आणि त्यामुळे, त्यांच्या मित्राचा जीव गेला असे त्यांना वाटत. या घटनेच्या काही दिवसानंतर, त्यांच्यावर निष्काळजीपणाने वाहन चालविण्याचा आरोप लावला गेला आणि १० युरो दंड आकारण्यात आला.
सोबर्स यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या लिहिले की,” त्या रात्रीच्या घटनांनी माझ्या विचारांवर प्रभुत्व मिळवले आणि क्रिकेट काही काळ दूर झाले.”
जेव्हा हा धक्का आणि दु: ख कमी झाले तेव्हा सोबर्स इंग्लंड विरुद्ध १९५९-६० च्या मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात ब्रिजटाऊन येथे खेळले. बाद होण्याआधी त्यांनी १० तास ४७ मिनिटे फलंदाजी करत २२६ धावा केल्या. सोबर्स यांच्या मते, ‘त्याला हे समजले होते की, मला गॅरी सोबर्स आणि कोली स्मिथ या दोघांचेही काम करायचे आहे.’
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अबब! ‘हा’ स्पिन पाहिल्यावर तुम्ही शेन वॉर्न अन् मुरली धरनलाही विसरून जाल
शॉकिंग! दिग्गज क्रिकेट अंपायरचा कार अपघातात जागीच मृत्यू, भारताशी होते खास नाते
भारतीय संघातून बाहेर असलेल्या गोलंदाजाचे इंग्लंडमध्ये जबरदस्त प्रदर्शन, व्हायरल होतोय व्हिडिओ