ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी (31 जुलै) करण्यात आली. विशेष म्हणजे 11 महिन्यानंतर पुनरागमन करत असलेल्या जसप्रीत बुमराह याच्याकडे संघाचे नेतृत्व दिले असून, त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
मागील वर्षी आयपीएलनंतर बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याने भारतीय संघासाठी क्रिकेट खेळले नाही. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दोन सामने खेळल्यानंतर त्याची दुखापत पुन्हा चिघळली. त्यामुळे आशिया चषक व टी20 विश्वचषक या दोन महत्त्वाच्या स्पर्धा तो खेळू शकला नाही. यावर्षी देखील त्याने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय व आयपीएल सामना खेळला नव्हता.
काही दिवसांपूर्वीच तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आलेले. दौऱ्यावर तो खेळणार असल्याचे देखील नक्की केलेले. मात्र, आता थेट त्याच्याकडे संघाचे नेतृत्व देऊन बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला.
मागील दोन वर्षाच्या काळात नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या व्यतिरिक्त केएल राहुल, शिखर धवन व हार्दिक पंड्या यांनी भारताचे नेतृत्व केले आहे. त्याबरोबरच आगामी एशियन गेम्समध्ये ऋतुराज गायकवाड भारताचा कर्णधार असेल. तसेच आयर्लंडविरुद्ध बुमराह याला कर्णधार बनवून आणखी एक पर्याय तयार केल्याचे दिसते.
बीसीसीआयच्या निर्णयावर टीका देखील मोठ्या प्रमाणात होतेय. कारण, बुमराह कितपत तंदुरुस्त आहे हे कोणालाही माहित नाही. तसेच, एशियन गेम्समध्ये नेतृत्व दिलेल्या ऋतुराज यालाच ही संधी द्यायला हवी होती असे अनेकांनी म्हटले.
(Comeback Man Bumrah Lead Team India In Ireland)
महत्वाच्या बातम्या –
ASHES 2023 । चौथ्या दिवसाखेर इंग्लिश चाहत्याचा ख्वाजाशी पंगा! लॅबुशेननं मागे वळून काय केलं पाहाच
धोनीने कलेक्शनमधून बाहेर काढली ‘ही’ जबरदस्त मसल कार, रांचीत ड्राईव्ह करतानाचा व्हिडिओ व्हायरल