पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत कॉमेंट्स, ईगल्स, हॉक्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत कॉमेट्स संघाने स्वान्स संघाचा 5-2असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कॉमेट्सकडून सुधांशू मेडसीकर, पराग चोपडा, हर्षवर्धन आपटे, अनिकेत सहस्त्रबुद्धे, विनीत रुकारी, भरत कुवल, आदिती रोडे, संग्राम पाटील, जनक वाकणकर, भाग्यश्री देशपांडे, विवेक जोशी, अविनाश दोशी यांनी अफलातून कामगिरी केली.
दुसऱ्या सामन्यात सुमेध शहा, हर्षद बर्वे, अश्विन शहा, अमर श्रॉफ, आनंद घाटे, सचिन काळे, आकाश सूर्यवंशी, राजश्री भावे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर हॉक्स संघाने फाल्कन्स संघाचा 4-3असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
अन्य लढतीत ईगल्स संघाने रेवन्स संघावर 5-2अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
कॉमेट्स वि.वि.स्वान्स 5-2(गोल्ड खुला दुहेरी गट: सुधांशू मेडसीकर/पराग चोपडा वि.वि.तेजस चितळे/आर्य देवधर 19-21, 21-12, 11-10; सिल्वर खुला दुहेरी गट: हर्षवर्धन आपटे/अनिकेत सहस्त्रबुद्धे वि.वि.अमोल मेहेंदळे/सुदर्शन बिहानी 21-17, 16-21, 11-9; गोल्ड खुला दुहेरी गट: राजशेखर करमरकर/विमल हंसराज पराभूत वि.आदित्य काळे/सारंग लागू 15-21, 17-21;सिल्वर खुला दुहेरी गट: विनीत रुकारी/भरत कुवल वि.वि.मनीष शाह/यश बहुलकर 15-12, 15-9; गोल्ड मिश्र दुहेरी: आदिती रोडे/संग्राम पाटील वि.वि.बिपीन चोभे/सारा नावरे 21-19, 21-14; सिल्वर मिश्र दुहेरी: जनक वाकणकर/भाग्यश्री देशपांडे वि.वि.चिन्मय चिरपुटकर/देबश्री दांडेकर 15-13, 10-15, 11-8; 49वर्षावरील गट: विवेक जोशी/अविनाश दोशी वि.वि.नरेंद्र पटवर्धन/निलेश केळकर 21-13, 21-12);
हॉक्स वि.वि.फाल्कन्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट: सुमेध शहा/हर्षद बर्वे वि.वि.तेजस के/निखिल शहा 21-20, 21-16; सिल्वर खुला दुहेरी गट: अश्विन शहा/अमर श्रॉफ वि.वि.अजिंक्य मुठे/मधुर इंगहाळीकर 21-8, 21-13; गोल्ड खुला दुहेरी गट: बिपीन देव/आलोक तेलंग पराभूत वि.विक्रांत पाटील/देवेंद्र चितळे 18-21, 13-21; सिल्वर खुला दुहेरी गट: आनंद घाटे/सचिन काळे वि.वि.आशिष देसाई/अमित धर्मा 15-10, 15-2; गोल्ड मिश्र दुहेरी गट: सुरेश वाघेला/दीपा खरे पराभूत वि.चैत्राली नावरे/अतुल बिनिवाले 15-21, 17-21; सिल्वर मिश्र दुहेरी गट: आकाश सूर्यवंशी/राजश्री भावे वि.वि.मृदुला राठी/सचिन जोशी 15-8, 15-10; 49वर्षावरील गट: हेमंत पाळंदे/हरीश गलानी पराभूत वि.प्रशांत वैद्य/गिरीश करंबेळकर 19-21, 20-21);
ईगल्स वि.वि.रेवन्स 5-2(गोल्ड खुला दुहेरी गट: अमित देवधर/मिहीर केळकर पराभूत वि.केदार नाडगोंडे/श्रीयश वर्तक 21-17, 14-21, 6-11; सिल्वर खुला दुहेरी गट: रवी कासट/शिव पराभूत वि.मंदार विंझे/विश्वेश कट्टकर 15-14, 10-15, 4-11; गोल्ड खुला दुहेरी गट: सारंग आठवले/तुषार नगरकर वि.वि.चेतन वोरा/आयुश गुप्ता 21-10, 21-14; गोल्ड मिश्र दुहेरी गट: मिहीर पाळंदे/इशा साठे वि.वि.कुणाल पाटील/दीप्ती सरदेसाई 21-20, 21-15; सिल्वर मिश्र दुहेरी गट: गिरीश मुजुमदार/गौरी कुलकर्णी वि.वि.वेदांत खटोड/प्रांजली नाडगोंडे 15-14, 15-11; 49वर्षावरील गट: राजेंद्र नखारे/विनायक करमरकर वि.वि.संदीप साठे/जयकांत वैद्य 21-14, 21-16);
फाल्कन्स वि.वि.ईगल्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट: तेजस किंजवडेकर/निखिल शहा वि.वि.मिहीर पाळंदे/तुषार नगरकर 21-12, 21-14; सिल्वर खुला दुहेरी गट: मधुर इंगहाळीकर/अजिंक्य मुथा पराभूत वि.मिहीर केळकर/अनिश राणे 13-21, 17-21; गोल्ड खुला दुहेरी गट: देवेंद्र चितळे/विक्रांत पाटील वि.वि.अनिकेत दामले/सारंग आठवले 21-19, 21-20; गोल्ड मिश्र दुहेरी गट: अतुल बिनिवाले/चैत्राली नावरे पराभूत वि.अमित देवधर/इशा साठे 18-21, 06-21; सिल्वर मिश्र दुहेरी गट: सचिन जोशी/राधा चिरपुटकर पराभूत वि.गिरीश मुजुमदार/गौरी कुलकर्णी 15-14, 14-15, 10-11; 49वर्षावरील गट: गिरीश करंबेळकर/प्रशांत वैद्य वि.वि.राजेंद्र नखारे/विनायक करमरकर 21-15, 18-21, 11-10).