आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा महाकुंभमेळा सुरू होण्यासाठी अवघे 5 दिवस उरले आहेत. 5 ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. अशात स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आयसीसीने कॉमेंट्री पॅनेलची घोषणा केली आहे.
माजी क्रिकेटपटूंनी सजली समालोचकांचे पॅनेल
या पॅनेलमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि इंग्लंडचा माजी कर्णधार ऑयन मॉर्गन यांना सामील करण्यात आले आहे. पाँटिंग आणि मॉर्गन यांच्याव्यतिरिक्त या यादीत शेन वॉटसन, लिसा स्थळेकर, रमीज राजा, रवी शास्त्री, ऍरॉन फिंच, सुनील गावसकर आणि मॅथ्यू हेडन यांचा समावेश असेल. तसेच, इयान स्मिथ, नासिर हुसेन आणि इयान बिशप यांचे त्रिकुट आयसीसी कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसेल.
Some of the most recognisable voices in the game will call the #CWC23 in India 🎙https://t.co/sqDDhRAoSP
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) September 29, 2023
हे दिग्गजांही पसरवणार आवाजाची जादू
समालोचन पॅनेलमध्ये (Commentry Panel) सामील असेलेले वकार युनूस, शॉन पोलॉक, अंजुम चोप्रा आणि मायकल एथर्टन कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतील. सायमन डूल, म्पुमेलेलो मबांगवा, संजय मांजरेकर, केटी मार्टिन, दिनेश कार्तिक, डर्क नॅनेस, सॅम्युअल बद्री, अतहर अली खान आणि रसेल अर्नाल्डही कॉमेंट्री पॅनेलमध्ये असतील.
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत आपल्या आवाजाची जादू पसरवण्यासाठी कॉमेंट्र पॅनेलमध्ये आणखी काही दिग्गजांची नावे सामील आहेत. त्यामध्ये आघाडीचे क्रीडा पत्रकार आणि समालोचक हर्षा भोगले, कास नायडू, नार्क निकोलस, नताली जर्मनोस, मार्क हॉवर्ड आणि इयान वॉर्ड यांसारखे दिग्गजही समालोचन करताना दिसतील.
विश्वचषकाविषयी थोडक्यात
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत एकूण 10 संघ उतरणार आहेत. ही स्पर्धा या 10 संघांमध्ये एकूण 45 दिवस खेळवली जाणार आहे. यादरम्यान एकूण 48 सामने खेळले जातील. हे 48 सामने भारतातील 10 प्रमुख शहरांमधील स्टेडिअमवर पार पडतील. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडेल. (commentary panel announced for odi world cup 2023 see list here)
हेही वाचा-
‘माझी प्लेइंग 11मधून अचानक हाकालपट्टी केली…’, भारताविरुद्ध न खेळवल्याबद्दल पाकिस्तानी खेळाडूचे मोठे विधान
कधी, कुठे आणि कसा पाहता येईल IND vs ENG संघातील सामना? एका क्लिकवर मिळेल सर्व माहिती