27 नोव्हेंबरपासून भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 वनडे, 3 टी20 आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर समालोचन करताना दिसणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे प्रसारण हक्क सोनी पिच्चर्स नेटवर्ककडे आहे. त्यामुळे त्यांनी अगामी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समालोचकांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये केवळ इंग्लिंग समालोचनासाठी ग्लेन मॅकग्रा आणि निक नाईट आहेत. तर हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये समालोचन करण्यासाठी हर्षा भोगले, संजय मांजरेकर, अजित अगरकर, मुरली विजय आणि अजय जडेजा हे असणार आहेत.
सेहवागचा हिंदी समालोचकांच्या पॅनलमध्ये समावेश आहे. केवळ हिंदी समालोचन करणाऱ्यांच्या पॅनलमध्ये सेहवागसह मोहम्मद कैफ, विवेक राझदान, विजय दहिया, अर्जून पंडीत आणि झहिर खान असतील. हर्षा भोगले आणि अर्जून पंडित ‘एक्ट्रा इंनिंग’ या सामन्यांदरम्यानच्या कार्यक्रमाचे निवेदकही असतील.
याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामन्यांचे तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रसारण होणार आहे. तमिळ समालोचकांच्या पॅनलमध्ये टी आरसू, शेशाद्री श्रीनिवासन, विद्यूत शिवरामक्रिष्णन, आर सतिश आणि नवीन शौर हे असतील. तर तेलुगू समालोचकांच्या पॅनलमध्ये आरजे हेमंत, विजय महावादी, ज्ञानेश्वर राव, सी व्यंकटेश आणि इल्लेंदुला रामप्रसाद हे असतील. याशिवाय एरिन हॉलंड मैदानातून निवेदन करतील.
To all the people who commented asking for the commentary panel 🗣️
HERE YOU GO 🤩Watch 🇮🇳 tour of 🇦🇺 starting 27th November, 8 AM onwards 🗓️
📺 Sony SIX, Sony TEN 1, Sony TEN 3#CricketKaAsliRang #CricketWithoutBoundaries #AUSvIND #SonySports #SirfSonyParDikhega #India pic.twitter.com/UYKssqbUs6— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 19, 2020
तसेच ऑस्ट्रेलियातून भारतीय प्रेक्षकांना शेन वॉर्न आणि ऍडम गिलख्रिस्ट यांच्या समालोचनाशिवाय एसपीएसएनच्या बॅन्ड ऑफ पॅनेलिस्ट्सचे कस्टमाइज्ड इंग्रजी आणि हिंदी समालोचन ऐकण्यास मिळणार आहे. एसपीएसनने फॉक्स स्पोर्ट्स ऑस्ट्रेलियाशीही करार कला असून ते एक्स्ट्रा इनिंग कार्यक्रमात अॅलन बॉर्डर, इशा गुहा आणि ब्रॅंडन ज्युलियन यांना सामील करतील. ऑस्ट्रेलियामधील प्रेक्षकांना फॉक्स स्पोर्ट ऑस्ट्रेलियाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एसपीएसएनच्या हिंदी समालोचनाचा आनंद घेता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘लगान’ चित्रपटाचा फोटो शेअर करत माजी दिग्गजाने आर अश्विनला केले ट्रोल
“मी निराशेतून लवकर बाहेर येईल आणि…”, भारतीय संघात निवड न झाल्यामुळे सूर्यकुमारने रोहितशी केली चर्चा
‘भारतात परतण्यापूर्वी विराट करणार काहीतरी खास’, ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज खेळाडूचे भाकीत