भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी (०६ मार्च) चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडवर एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. दरम्यान इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलच्या चेंडूवर इंग्लंडचा फलंदाज ओली पोप यष्टीचीत झाला. भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंत याने काही क्षणातच अप्रतिम पद्धतीने त्याची यष्टी उडवली. त्याच्या लक्षणीय यष्टीरक्षणाला पाहून सामना समालोचकांना माजी भारतीय यष्टीरक्षक एमएस धोनीची आठवण झाली.
त्याचे झाले असे की, आघाडीचे चार फलंदाज माघारी परतल्यानंतर पोप संघनायक जो रुटसोबत मिळून डावास चालना देत होता. अशात डावातील २५ वे षटक टाकण्यासाठी फिरकी गोलंदाज अक्षर आला. त्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर पोप क्रिजवरील सीमारेषेच्या पुढे येत मोठा शॉट मारायला गेला. परंतु चेंडू त्याच्या बॅटवर व्यवस्थित बसला नाही आणि सरळ यष्टीमागे गेला.
यावेळी पंतने अगदी धोनीच्या स्टाइलमध्ये क्षणार्धात चेंडू पकडला आणि यष्टीवर जबरदस्त थ्रो मारला. त्याने छातीवर आलेला चेंडू पकडला आणि क्षणाचाही विलंब न करता यष्टीला लावला. दुसरीकडे पोपने वेगाने मागे फिरत सीमारेषेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु तोवर फार उशीर झाल्याने तो यष्टीचीत झाला. यामुळे ३१ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १५ धावा करत त्याला पव्हेलिनला परतावे लागले.
यावेळी स्टार स्पोर्ट्सवर हिंदी भाषेत सामन्याचे समालोचन करत असलेले माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी पंतच्या यष्टीरक्षणाची प्रशंसा केली. ‘पंतमध्ये धोनीची आत्मा घुसली आहे,’ असे ते म्हणाले. तर स्टार स्पोर्ट्सवर इंग्लिशमध्ये समालोचन करत असलेले भारतीय दिग्गज सुनिल गावसकरही त्याच्या यष्टीरक्षणाचे प्रभावित झाले. पंत दिवसेंदिवस यष्टीरक्षणात अजून चांगला होत असल्याचे त्यांनी म्हटले.
https://twitter.com/Yorker_Gawd/status/1368111418134851586?s=20
चौथ्या कसोटी सामन्यात यष्टीरक्षणाबरोबर पंतने फलंदाजीतही दमदार कामगिरी केली. या सामन्यात त्याने झुंजार शतक करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितकडून घ्यावे फलंदाजीचे धडे; इंग्लंडविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या विराटला ‘या’ क्रिकेटपटूचा सल्ला
वाढदिवस विशेष: जेव्हा विवियन रिचर्ड्स यांनी कराचीतील मैदानावर आणले होते तुफान