---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकला गालबोट, कमेंट्रीदरम्यान समालोचकाची जीभ घसरली; चॅनलनं उचललं मोठं पाऊल

On: सोमवार, जुलै 29, 2024 4:06 PM
---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अनुभवी समालोचक बॉब बॅलार्ड यांनी महिला जलतरणपटूंबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्यामुळे ते अडचणीत आले आहेत. या वक्तव्यानंतर प्रसारकांनी बॉब बॅलार्ड यांना समालोचन पॅनलमधून काढून टाकलंय.

झालं असं की, ऑस्ट्रेलियाच्या महिलांचा 4×100 मीटर फ्रीस्टाइल जलतरण रिले संघ त्यांच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर पूलमधून बाहेर पडत होता. तेव्हा ‘युरो स्पोर्ट’ या चॅनेलवर समालोचन करत असलेले बॅलार्ड म्हणाले, “तुम्हाला माहिती आहे की स्त्रिया कशा असतात…त्या आजूबाजूला फिरत राहतात, आपला मेकअप करत असतात…”

बॉब बॅलार्ड गेल्या 40 वर्षांपासून समालोचन करत आहेत. त्यांनी वॉटर पोलो, आइस हॉकी, डायव्हिंग आणि पोहणे यासारख्या खेळांसाठी समालोचन केलंय. या घटनेदरम्यान, सह-समालोचक आणि ब्रिटीश जलतरण चॅम्पियन लिझी सिमंड्स यांनी त्यांच्या टिप्पण्यांना ‘लज्जास्पद’ असं म्हटलं, ज्यावर बॉब हसले.

या घटनेनंतर ‘युरो स्पोर्ट’नं बॅलार्ड यांना समालोचन पॅनेलमधून काढून टाकण्यात आल्याची पुष्टी केली आहे. चॅनेलनं म्हटलं, “काल रात्री ‘युरो स्पोर्ट’च्या कव्हरेज दरम्यान समालोचक बॉब बॅलार्ड यांनी एक अयोग्य टिप्पणी केली, ज्यामुळे त्यांना आमच्या समालोचन रोस्टरमधून त्वरित प्रभावानं काढून टाकण्यात आलं आहे.”

या घटनेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेक युजर्सनी बॅलार्ड यांच्या कमेंटला चुकीचं म्हटलं आहे. हा महिलांचा अपमान असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी ‘युरो स्पोर्ट’नं केलेल्या तत्काळ कारवाईचं कौतुक केलं आहे. ऑलिम्पिकमध्ये या स्पर्धेत मॉली ओ’कॅलाघन, एम्मा मॅककीन, मेग हॅरिस आणि शायना जॅक यांनी ऑस्ट्रेलियासाठी सलग चौथं सुवर्णपदक जिंकलं.

हेही वाचा – 

शूटिंगमध्ये भारताच्या पदरी निराशा, पदकाच्या लढतीत 20 वर्षीय रमिता जिंदालचं स्वप्न भंगलं
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या स्टार बॅडमिंटन जोडीला धक्का! दुसऱ्या फेरीचा सामना अचानक रद्द
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासोबत अन्याय, बॅडमिंटनपटूचा विजय ठरला अवैध! कारण जाणून बसेल धक्का

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---