---Advertisement---

अर्जुन तेंडुलकरविषयी न्यूझीलंडच्या दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘रोहितलाही माहितीये…’

Arjun-Tendulkar-And-Rohit-Sharma
---Advertisement---

पाच वेळचा चॅम्पियन असलेला मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करताना दिसत नाहीये. पहिल्या दोन सामन्यात पराभव, त्यानंतर पुढील तिन्ही सामन्यात सलग विजय आणि पुन्हा दोन सामन्यात पराभव अशी आयपीएलमधील अर्ध्या टप्प्यापर्यंत मुंबईने कामगिरी केली आहे. या हंगामात मुंबईने अर्जुन तेंडुलकर याला पदार्पणाची संधीही दिली आहे. त्याने मंगळवारी (दि. 25 एप्रिल) गुजरात टायटन्स संघाविरुद्ध खेळताना सलामीवीर वृद्धिमान साहा याची विकेट काढली होती. त्याने सामन्यात एकूण 2 षटके गोलंदाजी करताना 9 धावा खर्च करत एक विकेट घेतली. या सामन्यात मुंबईला 55 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने सामन्यातील आपल्या दुसऱ्याच षटकातील यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याला दुसऱ्याच चेंडूवर यष्टीमागे झेलबाद केले. मात्र, सुरुवातीला चांगली गोलंदाजी केल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्जुनला अखेरच्या षटकात गोलंदाजी दिली नाही. या सामन्यात मुंबईकडे जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हादेखील नव्हता. तसेच, अखेरच्या षटकात त्यांनी अधिक धावा खर्च केल्या. शेवटच्या चार षटकात मुंबईने तब्बल 70 धावा खर्च केल्या.

अर्जुनने पंजाब किंग्सविरुद्ध अखेरच्या षटकात गोलंदाजी करताना एका षटकात 31 धावा खर्च केल्या होत्या. आयपीएल 2023मध्ये अर्जुनच्या भूमिकेविषयी बोलताना न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सायमन डल (Simon Doull) यांनी मोठे वक्तव्य केले. गुजरातने 207 धावा करण्यापूर्वी डल म्हणाले की, “एका युवा खेळाडूला एका खराब सामन्यानंतर एवढ्या चर्चेत घेऊन येण्यास तुमची इच्छा होणार नाही. कारण, त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. मी खूप प्रामाणिकरीत्या विचार करतो की, रोहित शर्माला माहिती आहे की, तो अद्याप डेथ गोलंदाज नाहीये. तो असा गोलंदाज नाहीये, जो अखेरच्या चार किंवा पाच षटकात गोलंदाजी करेल. मात्र, त्याने अर्जुनला संधी दिली आणि याचे नुकसान त्याला झाले.”

सामन्याविषयी बोलायचं झालं, तर अभिनव मनोहर आणि डेविड मिलर यांच्यात 35 चेंडूत 71 धावांची भागीदारी झाली. या जोरावर गुजरातने 207 धावांची मोठी भागीदारी रचली. त्यानंतर नूर अहमद आणि राशिद खान याच्या नेतृत्वात गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाने गुजरात संघाने आयपीएलचा 35वा सामना 55 धावांनी आपल्या नावावर केला.

https://twitter.com/IPL/status/1650926690728804352

सामनावीर ठरलेल्या अभिनव मनोहर याने 21 चेंडूत 42 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 3 षटकारांचीही बरसात केली. अखेरच्या षटकात राहुल तेवतिया याने 5 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 20 धावांचे योगदान दिले. गुजरातसाठी सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याने 34 चेंडूत 56 धावांची खेळी केली.

गुजरातच्या 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला 9 विकेट्स गमावत 152 धावाच करता आल्या. या विजयामुळे गुजरात संघ 7 सामन्यात पाच विजयांसह 10 गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. (commentator simon doull says Skipper rohit sharma know about arjun tendulkar bowling makes a big statement)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाय मोडल्यानंतर बेअरस्टोचे वादळी कमबॅक, 15 षटकार-चौकारांचा पाऊस पाडत ठोकल्या 97 धावा
‘रिपोर्टर, तुला लाज वाटली पाहिजे…’, संमतीशिवाय बातमी दिल्याने आर्चरच्या तळपायाची आग मस्तकात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---