नव्याने सुरू होत असलेल्या दक्षिण आफ्रिका टी20 लीग (एसए टी20 लीग) या स्पर्धेची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील अनेक नामांकित खेळाडू खेळताना दिसणार आहेत. नुकतीच या स्पर्धेसाठीच्या समालोचकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक भारतीय समालोचकांचा समावेश आहे.
एसए टी20 लीगकडून समालोचकांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. भारतात जिओ सिनेमा व स्पोर्ट्स 18 हे या स्पर्धेचे प्रसारण करतील. हिंदी समालोचकांच्या यादीमध्ये अनेक परिचित नावे सामील आहेत. यामध्ये आकाश चोप्रा, सुरेश रैना, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा व इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ओवेस शहा यांचा समावेश आहे.
ही स्पर्धचे प्रसारण भारतातील काही प्रादेशिक भाषांमध्ये देखील होईल. तमिळ प्रेक्षक अभिमन्यू मिथुन व अनिरुद्ध श्रीकांत यांच्या आवाजात स्पर्धेची मजा घेताना दिसतील. तर, तेलुगु भाषेत व्यंकटपती राजू, संदीप बावनका व अक्षत रेड्डी हे समालोचन करताना दिसणार आहेत.
इंग्लिश समालोचनाबद्दल बोलायचे झाले तर एबी डिव्हिलियर्स, मार्क बाऊचर, एश्वेल प्रिन्स, शॉन पोलॉक, हर्शेल गिब्स, ख्रिस मॉरिस, केविन पीटरसन, पौमी एमबांगवा, मार्क निकोल्स, डॅरेन गॉफ, माइक हेसमन, ऊरूज मुमताज आणि व्हर्नाश फिलँडर सारखे दिग्गज असतील. या स्पर्धेतून एबी डिव्हिलियर्स समालोचक म्हणून आपले पदार्पण करेल.
दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये सहा संघ सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व संघ आयपीएलमधील फ्रॅंचायजीने विकत घेतले आहेत. आयपीएलप्रमाणे खेळाडूंचा लिलाव होणारी ही केवळ दुसरी लीग आहे. लीगची सुरुवात 10 जानेवारी रोजी होऊन अंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.
(Commenters For SAT20 League Announced Aakash Chopra Raina Include)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
40 वर्षापासून श्रीलंका भारतात फेल! सूर्य खेळीने विजय साकार, भारताच्या यशाचे काही बलाढ्य रेकॉर्ड्स
आयपीएल न खेळता पंत मालामाल! बीसीसीआय मोजणार 21 कोटींची रक्कम